घरठाणेशीळ-कळवा-मुंब्य्रात 6 कोटींची वीज बिल थकबाकी

शीळ-कळवा-मुंब्य्रात 6 कोटींची वीज बिल थकबाकी

Subscribe

 कडक कारवाईचा टोरंटचा इशारा

दोन महिन्यांपूर्वी, टोरेंट पॉवर (टीपीएल) ने स्पष्ट केले होते की शिळ-मुंब्रा-कळवा (एसएमके ) फ्रँचायझी क्षेत्रातील सुमारे 500 बड्या लोकांकडे 10 कोटींची वीज थकबाकी आहे. या 500 पैकी सुमारे 250 जण पुढे आले असून त्यांनी थकबाकी भरण्यास सुरुवात केली आहे. तथापि, टीपीएलद्वारे नियमित पाठपुरावा आणि स्मरणपत्रे देऊनही, सुमारे 250 ग्राहक अद्याप त्यांची थकबाकी भरण्यासाठी आलेले नाहीत. या 250 ग्राहकांची एकत्रित थकबाकी सुमारे 6 कोटी आहे.

टीपीएलने पुन्हा ही वीज थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे. यापैकी बहुतेक बड्या थकबाकीदारांना  टीपीएलकडून विनंती केली जात आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांची वीज थकबाकी भरावी, असे न केल्यास आता या 250 ग्राहकांवर नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल. त्यांची नावेही सार्वजनिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही कंपनीने कळवले आहे. एसएमके फ्रँचायझी क्षेत्रातील टीपीएलची एकूण थकबाकी सुमारे रुपये 145 कोटी वर पोहोचली आहे. यामुळे टीपीएल कठोर वसुली मोहीम सुरू करणार आहे. बिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्यासारख्या गैरसोयीला सामोरे जावे लागू नये, यासाठी टीपीएलने ग्राहकांना त्यांची वीज देयके वेळेवर भरण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -