घरठाणेत्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे काश्मिरी पंडितांच्या पाठीशी उभे राहिले- पालकमंत्री

त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे काश्मिरी पंडितांच्या पाठीशी उभे राहिले- पालकमंत्री

Subscribe

 काश्मिरी पंडितांवर जेंव्हा अत्याचार होत होता. त्यावेळी आता बोलणारे कोणी तेंव्हा बोलताना दिसत नव्हते. त्यावेळी केवळ बाळासाहेब ठाकरे  हे काश्मिरी पंडितांच्या पाठीशी उभेच नाहीतर त्यांचे संरक्षणही केले. तसेच पाकविरोधात फक्त बाळासाहेब बोलत होते असे उद्गार काढत  ठाण्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर आगपाखड केली. ३७० कलम लागु झाला आहे. आतातरी त्या निर्वासित काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन योग्य प्रकारे व्हावे आणि त्यांना न्याय मिळावा अशी सर्वांची इच्छा असल्याचे ही ते ठाण्यात सोमवारी रात्री एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

ठाण्यातील किसननगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार सोमावरी पार पडलेल्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी महाराजांना पुष्पहार अर्पन करून महाराजांची पालखी देखील पालकमंत्री यांनी खांद्यावर घेतली होती. या भव्य मिरवणुकीसाठी पालकमंत्री मान्यवर म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली. जेंव्हा काश्मिरी पंडितांवर अत्याचार होत होता तेंव्हा बाळासाहेब केवळ पाठीशी नाहीतर त्यांना सरंक्षण देण्याचे काम ही त्यांनी केली.

- Advertisement -

आता बोलणारे त्यावेळी कोणी बोलत नव्हते.  तेंव्हा बाळासाहेब पाक विरोधात बोलत होते. ३७० कलमाविषयी विचारले असता, त्याचे आम्ही त्याचे स्वागत करतो. मात्र त्यावेळी निर्वासित झालेल्या काश्मिरी पंडितांचे आता पुनर्वसन व्हावे, आणि त्यांना न्याय मिळावा येवढीच सर्वांची इच्छा असल्याचेही ते म्हणाले. तसेच दोन वर्षांनी नागरिकांना मोठया प्रमाणात शिवजयंती साजरी करता आली. तसेच निर्बंध शिथील केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -