घरठाणेअरुंद कल्व्हर्टमुळे गणेश नगरात पाणी तुंबण्याची भीती

अरुंद कल्व्हर्टमुळे गणेश नगरात पाणी तुंबण्याची भीती

Subscribe

पावसाळ्यापूर्वी तातडीने मोठा कल्व्हर्ट बांधण्यात यावा, मनसेचे प्रल्हाद म्हात्रे यांची केडीएमसीकडे मागणी

केडीएमसी मध्ये सध्या प्रशासकीय राजवट आहे. मात्र छोट्या छोट्या नागरी सुविधांच्या समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. डोंबिवली पश्चिमेतील गणेश नगर येथील येथील अरुंद असलेला कल्व्हर्ट चॉकअप होत आहे. परिणामी  पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यास या भागात पाणी तुंबून अनेक इमारतींमध्ये शिरून नुकसान होण्याची भीती मनसेचे डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.

रागाई मंदिराकडून ५२ चाळ कडे जाणारा रस्ता काही ठिकाणी रुंद आहे, तर मोती कृपा इमारती पासून पुढे चिंचोळा अरुंद आहे .त्यामुळे या रस्त्याच्या दुतर्फा गटारे बांधण्यात आलेली नाहीत. त्यामुळे एका साईडचे गटार कल्व्हर्ट टाकून दुसऱ्या साईडच्या गटाराला जोडण्यात आले आहे. मात्र हा कल्व्हर्ट जुना व अरुंद असल्याने तो गाळाने भरून चॉकअप होतो. पावसाळ्यात पावसाचे पाणी या कल्व्हर्टच्या वरून जाते. त्यामुळे आजूबाजूच्या भागात पावसाचे पाणी तुंबते .मोठ्या पावसात तर गणेश नगर मधील न्यू साई कृपा, सरस्वती सदन, स्वप्न रेखा, लक्ष्मी निवास, मोती कृपा व आशीर्वाद आदी इमारतींच्या परिसरात पाणी शिरते. तळ मजल्यावर राहणाऱ्या राहिवासियांच्या घरात पावसाचे पाणी शिरून नुकसान होण्याची भीती आहे. गेल्या काही वर्षात समस्या वारंवार भेडसावत असल्याने केडीएमसीने पावसाळ्यापूर्वी तातडीने तेथे मोठा कल्व्हर्ट बांधून द्यावा व नागरिकांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी प्रल्हाद म्हात्रे यांनी केडीएमसी प्रशासनाकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -