घरठाणेकेडीएमसी आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना दिला अतिरिक्त कार्यभार

केडीएमसी आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना दिला अतिरिक्त कार्यभार

Subscribe

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ इंदूराणी जाखड यांनी आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यापासून साईट व्हिजीट करीत जंबो बैठकाचा धडाका लावला आहे. महिन्याभरात घेतलेल्या बैठकापश्चात त्यांनी गुरुवारी उपायुक्तांकडे असलेल्या खात्यांसह इतर खात्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. उपायुक्त धैर्यशील जाधव यांच्याकडील परिमंडळ १ चा पदभार आणि उपायुक्त अर्चना दिवे यांच्याकडील विधी विभागाचा पदभार हा उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे विविध विभागांचा नियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज दिले आहे.

केडीएमसी उपायुक्त अर्चना दिवे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग असून त्यांना अग्निशमन विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग, निवडणूक जनगणना विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. उपायुक्त धैर्यशील जाधव यांच्याकडे वाहन व यांत्रिकी विभाग असून त्यांच्याकडे भांडार विभाग, स्थानिक संस्था कर विभाग, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक विभाग, दक्षता व गुणनियंत्रण विभाग यांचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. उपायुक्त अवधूत तावडे यांच्याकडे परिमंडळ कार्यालय २ हा पदभार असून त्यांना अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम प्रतिबंध निर्मूलन विभाग सुरक्षा विभागाचा अतिरिक्त पदभार दिला आहे.

- Advertisement -

उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्याकडे कर मालमत्ता कर व इतर विभाग असून त्यांना एनयुएलएम विभाग, महिला बालकल्याण व समाज विकास विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. उपायुक्त वंदना गुळवे यांच्याकडे मालमत्ता व्यवस्थापन विभाग असून त्यांना भूसंपादन व पुनर्वसन विभाग, बाजार व परवाना विभाग, महापालिका सचिव या पदांचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. उपायुक्त अतुल पाटील यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन विभाग असून त्यांच्याकडे पर्यावरण विभाग, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभाग, माझी वसुंधरा हि खाती अतिरिक्त देण्यात आली आहेत. तर उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभाग, फेरीवाला हटाव मोहीम, विधी विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

तसेच अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी मालमत्ता कर व इतर, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम प्रतिबंध/निर्मूलन विभाग, शिक्षण/क्रिडा व सांस्कृतीक विभाग, महिला/बालकल्याण व समाज विकास विभाग, पर्यावरण, भांडार विभाग, या विभागांचे “नियंत्रण अधिकारी” म्हणुन कामकाज पाहायचे असुन या विभागातील कामकाजाचा आढावा दर १५ दिवसांनी आयुक्तांना सादर करायचा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -