घरठाणेपाच लाखांसाठी वृद्धाचे अपहरण

पाच लाखांसाठी वृद्धाचे अपहरण

Subscribe

पोलिसांनी त्रिकुटाला केले जेरबंद

श्रीलंकेत शिपिंगमध्ये कामाला लावण्यासाठी दिलेले पैसे परत मिळविण्यासाठी एका वृद्ध शिपिंग एजंटचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. सुभाशिष बॅनर्जी (६५ ) असे अपहरण करण्यात आलेल्या शिपिंग एजंटचे नाव आहे. बॅनर्जी यांच्या पत्नीने मानपाडा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केल्यानंतर मानपाडा पोलिसांनी नालासोपारा येथून बॅनर्जी यांची सुटका करीत तिघांना जेरबंद केले.

श्रीलंकेत शिपिंगमध्ये कामाला लावण्यासाठी तीन तरुणांनी मनजीत यादव नावाच्या शिपिंग एजंटला तीन लाख रुपये दिले होते. मनजीत यादवने हे काम करण्यासाठी पैसे सुभाशिष बॅनर्जीकडे दिले. त्यानुसार बॅनर्जीने तीन तरुणांचे नोकरीचे काम केले. श्रीलंकेला जाण्याची तारीखही निश्चित झाली. तरुणांचा कामाचा व्हिसाही बनवण्यात आला. यासाठी तीन लाख रुपये खर्च झाले. मात्र तितक्यात तीन तरुणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने तिघांना १५  दिवस क्वारन्टाईन करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या व्हिसाची मुदत संपली. त्यामुळे हे तरुण श्रीलंकेला जाऊ शकले नाहीत.

- Advertisement -

तरुणांच्या नोकरीचे काम न झाल्याने मनजीत यादव याने बॅनर्जीकडे तीन लाख रुपये परत मागितले, तेव्हा बॅनर्जीने हे पैसे व्हिसासाठी खर्च झाल्याचे सांगितले. वारंवार तगादा लावूनही बॅनर्जीकडून पैसे मिळत नसल्याने मनजीत यादवने पैसे मिळवण्यासाठी दोन साथीदारांच्या मदतीने बॅनर्जीचे अपहरण केले. अपहरणाची माहिती कळताच याप्रकरणी बॅनजी यांच्या पत्नीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त सचीन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी सुनिल तारमळे आणि दत्तात्रय सानप यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला.

याच दरम्यान मनजीत हा बॅनर्जी यांच्या पत्नीला वारंवार फोन करुन पाच लाख रुपयांची मागणी करीत होता. पैसे दिले नाही तर जीवे ठार मारुन टाकण्याची धमकी देत होता. इतकेच नाही तर अकाऊंटमध्ये पैसे टाकण्यास सांगितले होते . पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे तपास करीत नालासोपारा येथील गोराई नाक्या जवळील एका हॉटेलमधून बॅनर्जी यांची सुखरूप सुटका केली. तसेच आरोपी मनजीतसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली . तिघे आरोपी उत्तर प्रदेशात राहणारे असून धनंजय यादव आणि सोमप्रकाश यादव अशी अन्य दोन साथीदारांची नावे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -