घरठाणेMega Block : रविवारी फिरायला जाताय; 'या' कालावधीत मध्य अन् हार्बर मार्गावर...

Mega Block : रविवारी फिरायला जाताय; ‘या’ कालावधीत मध्य अन् हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

Subscribe

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभागाकडून रविवार (19 नोव्हेंबर) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. (Mega Block Going for a walk on Sunday Mega block on Central and Harbor route during this period)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या ट्रेन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे डाऊन मार्गावर वळवल्या जातील. घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.

- Advertisement -

हेही वाचा – FIR मध्ये पहिलं नाव शरद पवारांचे; काळं फासल्यानंतर नामदेव जाधवांची पहिली प्रतिक्रिया आली समोर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे हार्बर लाईन सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत आणि
चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 या वेळेत सुटणारी वाशी/बेलापूर/पनवेल डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

- Advertisement -

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

हेही वाचा – अंजली दमानिया पोलिसांच्या ताब्यात; भुजबळांविरोधात करणार होत्या मोठा खुलासा

हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने विनंती केली आहे की, होणार्‍या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -