घरमहाराष्ट्रपुणेFIR मध्ये पहिलं नाव शरद पवारांचे; काळं फासल्यानंतर नामदेव जाधवांची पहिली प्रतिक्रिया...

FIR मध्ये पहिलं नाव शरद पवारांचे; काळं फासल्यानंतर नामदेव जाधवांची पहिली प्रतिक्रिया आली समोर

Subscribe

पुणे : सध्या राज्यात मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा तापला असतानाच शरद पवार ‘ओबीसी’ असल्याचा दावा प्राध्यापक नामदेव जाधव यांनी केला होता. नामदेव जाधवांनी सोशल मीडियावर एक प्रमाणपत्र शेअर केलं आहे. त्यात शरद पवार हे ‘ओबीसी’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रसेच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फाललं आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासलं आहे. यानंतर आता नामदेव जाधव यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. (Sharad Pawars first name in FIR Namdev Jadhavs first reaction came out after the blackout Rohit Pawar)

हेही वाचा – नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासलं; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

- Advertisement -

नामदेव जाधव म्हणाले की, पुण्यात पत्रकारांसमोर मराठा आरक्षणाची भूमिका मांडत होता. यावेळी मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवार असल्याचे कागदपत्र वाचत असताना राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांना राग अनावर झाला आणि त्यांनी मला काळं फासलं. आज आमचा शिवजयंती @ सिंगापूरला माहिती देण्याचा कार्यक्रम या लोकांनी उधळून लावला आहे. त्यानंतर मी पत्रकारांशी बोलत असताना कार्यकर्त्यांनी पत्रकार भवन पुणे येथे माझ्यावर हल्ला केला आहे. मी असं समजतो की, हा हल्ला करून गुंडांनी शिव, फुले, शाहू आणि आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या विचारांचा खुण केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगभर जाऊ नये म्हणून यासाठी त्यांनी माझ्यावर हा हल्ला केला आहे, असा आरोप नामदेव जाधव यांनी केला आहे.

माझ्यावरील हल्ला कायद-सुव्यवस्थेला आव्हान करणारा 

नामदेव जाधव म्हणाले की, माझ्या बचावासाठी पोलीस कर्मचारी कांबळे असताना हा हल्ला झाला आहे. कांबळे यांनी जीवा महालेसारखं आज काम केलं. त्यांनी एकट्यांनी माझा बचाव करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला झाला त्यावेळी त्या कर्मचाऱ्याच्या आणि माझ्या जीवाला धोका होता. हा हल्ला लोकशाहीवर, पोलिसांवर आणि कायद-सुव्यवस्थेला आव्हान करणारा आहे. त्यामुळे या संदर्भात जेवढे लोक दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नामदेव जाधव यांनी टीव्ही 9 शी बोलताना केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अंजली दमानिया पोलिसांच्या ताब्यात; भुजबळांविरोधात करणार होत्या मोठा खुलासा

एफआयआरमध्ये शरद पवाराचं पहिलं नाव

मी माझ्या वैयक्तिक गोष्टीसाठी भांडत नव्हतो. मराठा आरक्षणासंदर्भात हा विषय होता, असे स्पष्ट करताना नामदेव जाधव म्हणाले की, 5 कोटी लोकांवरचा हा हल्ला आहे, असं समजायला हरकत नाही. मी पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे. या संदर्भात कायदेशीर कारवाई मी करणार आहे. मी या हल्ल्यात कार्यकर्त्यांना जबाबदार धरणार नाही. परंतु यासाठी शरद पवाराचं एफआयआरमध्ये पहिलं नाव असणार आहे आणि दुसरं नाव रोहित पवारांचं असणार आहे. या दोघांची आमदारकी आणि खासदारकी रद्द करण्यासाठी मी प्रचंड मोठं पाऊल उचलणार आहे, असा इशारा नामदेव जाधव यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -