घरठाणेRam Mandir : "डोंबिवलीत होणाऱ्या विश्वविक्रमी दीपोत्सवात सहभागी व्हा", श्रीकांत शिंदेंचे आवाहन

Ram Mandir : “डोंबिवलीत होणाऱ्या विश्वविक्रमी दीपोत्सवात सहभागी व्हा”, श्रीकांत शिंदेंचे आवाहन

Subscribe

प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध शहरातील प्रमुख ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण मतदारसंघाला एक उत्सवाचे स्वरूप प्राप्त होणार आहे.

डोंबिवली : प्रभू श्री रामाच्या अयोध्येतील मंदिर लोकार्पण सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे. या सोहळ्याचे अयोध्येसह देशभरात उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण आहे.  या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघात विश्वविक्रमी दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. या सोहळा संस्मरणीय करण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने 21 जानेवारी रोजी डोंबिवलीतील ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात 1 लाख 11 हजार 111 दिव्यांमधून प्रभू श्री रामाचे चित्र साकारला जाणार आहे.  हे दिवे प्रज्वलीत केल्यानंतर प्रभू श्रीरामाचे चित्र विहंगम दृश्य डोळ्यांत साठवता येणार आहे. या दिपोत्सव कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही श्रीकांत शिंदेंनी केले आहे.

राम मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्ताने दीपोत्सवाची विश्वविक्रम म्हणूनही नोंद केली जाणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या राम भक्तांच्या उपस्थितीत महाआरती देखील पार पडणार आहे. तसेच मतदारसंघात नऊ ठिकाणी आकर्षक अशी रोषणाई करण्यात येणार आहे. गेल्या पाचशे वर्षांपासूनचे जगभरातील हिंदू बांधवांचे अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या उभारणीचे स्वप्न पाहत होते. आता राम मंदिराचे प्रत्यक्षात आले आहे. येत्या 22 जानेवारी रोजी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे उद्घाटन होणार आहे.  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही श्रीराम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त राज्यात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला प्रतिसाद देत कल्याण लोकसभा मतदारसंघातश्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने जयघोष प्रभू श्रीरामाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मोफत डाळ आणि साखरेचे वाटप करण्यात येते आहे. लोकसभा मतदारसंघातील सुमारे पाच लाख कुटुंबापर्यंत या जीन्नसाचे वाटप केले जाते आहे. त्यात प्रभू श्री राम मंदिराची प्रतिकृती, पुस्तकांचे मंदिर, विविध दहा ठिकाणी विद्युत रोषणाई, रामायण कार्यक्रम अशा विविधा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच निमित्ताने राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीतील ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचा शेजारील मैदानात भव्य दिपोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. 21 जानेवारी रोजी सायंकाळी या मैदानात भव्य रांगोळी साकारली जाणार आहे. या रांगोळीवर 1 लाख 11 हजार 111 दिव्यांची आरास केली जाणार आहे. हे दिवे प्रज्वलीत केल्यानंतर प्रभू श्रीरामाचे चित्र विहंगम दृश्य डोळ्यांत साठवता येणार आहे. या दीपोत्सव कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचा – Mumbai Pune Expressway : उद्या प्रवास करणार असाल तर आजच करा नियोजन; तब्बल सहा तास वाहतूक बंद

- Advertisement -

दीपोत्सवाचा विश्वविक्रमाचे साक्षीदार व्हावा

21 जानेवारी रोजी होणारा या दिपोत्सवाची विश्वविक्रम म्हणून नोंद केली जाणार आहे. त्यासाठी तयारी करण्यात आली असून हा दिपोत्सव देशातील सर्वात मोठा दिपोत्सव ठरण्याची आशा आहे. इंडिया वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी या दिपोत्सवाच्यावेळी मैदानात उपस्थित असणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा – MLA Disqualification : सुप्रीम कोर्टात 22 तारखेला राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधातील याचिकेवर सुनावणी

राम मंदिराच्या लोकार्पणानिमित्ताने ठाण्यात येथे होणार विद्युत रोषणाई

प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध शहरातील प्रमुख ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण मतदारसंघाला एक उत्सवाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. यामध्ये 90 फीट रस्ता खारेगाव कळवा, कळवा नाका, शिळफाटा जंक्शन, फडके रोड डोंबिवली, चक्की नाका कल्याण, गरडा सर्कल डोंबिवली, सावळाराम क्रीडा संकुल डोंबिवली, गोल मैदान, चालीय मंदिर, झुलेलाल मंदिर उल्हासनगर, बायपास रस्ता शिवमंदिर अंबरनाथ या ठिकाणी ही विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -