घरठाणेअडथळा होणार्‍या मार्गावर निवडणूक साहित्य लावण्यास निर्बंध-जिल्हाधिकारी

अडथळा होणार्‍या मार्गावर निवडणूक साहित्य लावण्यास निर्बंध-जिल्हाधिकारी

Subscribe

ठाणे । सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीने बॅनर, मंडप तसेच इतर साहित्य रहदारीच्या मार्गावर लावण्यात येते. या साहित्य लावण्यास जिल्हा निवडणूक आयोगाने निर्बंध लावले आहेत. असा प्रकार कुठे आढळला तर त्यावर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले.

निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 16 मार्च, 2024 रोजी कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय, न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी, प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर निवडणुकीसंबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्प्लेट्स, कटआऊट्स, होर्डिंग्ज, कमानी लावणे तसेच रहदारीस अडथळा निर्माण होवू शकेल. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 6 जून 2024 पर्यंत निवडणुकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल, अशा पध्दतीने लावण्यास निर्बंध घातले आहेत. यामुळे या लोकसभा निवडणुकीत नागरिकांना रस्त्यावरून येजा करताना अडथळा निर्माण होणार्‍या कुणी उमेदवाराने निवडणुकीचे साहित्य लावले तर तात्काळ ते साहित्य काढण्यात येऊन कारवाई करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -