घरमुंबईMumbai News : 25 मेनंतर थकबाकीदार मालमत्ताधारकांवर कारवाईचा बडगा; बीएमसीचा इशारा

Mumbai News : 25 मेनंतर थकबाकीदार मालमत्ताधारकांवर कारवाईचा बडगा; बीएमसीचा इशारा

Subscribe

कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांनी जर येत्या 25 मे पर्यंत थकीत मालमत्ता कर न भरल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा महापालिकेकडून उगारण्यात येणार आहे.

मुंबई : कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांनी जर येत्या 25 मे पर्यंत थकीत मालमत्ता कर न भरल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा महापालिकेकडून उगारण्यात येणार आहे. मात्र तरीही पालिका प्रशासन 25 मे पर्यंत थकीत मालमत्ता कर भरण्याबाबत थकबाकीदार यांना विनंत्या करीत आहे. (Action plan by BMC against property owners in arrears after May 25)

सन 2023-24 या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्यासाठी 25 मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तासंबंधी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – nmmc Plantation : जागतिकवसुंधरा दिनी हरित नवी मुंबईचा संकल्प

मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत करभरणा करता यावा, यासाठी मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाच्यावतीने वेळोवेळी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. तथापि, अद्यापही करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी वेळीच कर जमा करुन दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisement -

‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची यादी

  1. सुमेर असोसिएट्स (एच/पश्चिम विभाग) – 135 कोटी 51 लाख 32 हजार 664 रुपये
  2. सुमेर बिल्ट कॉर्पोरेशन प्रा. लि. (ई विभाग) – 77 कोटी 6 लाख 11 हजार 713 रुपये
  3. अशापदारा डेव्हलपर्स (एच/पूर्व विभाग) – 44 कोटी 4 लाख 38 हजार 26 रुपये
  4. महाराष्ट्र थिएटर्स (एच/पूर्व विभाग) – 38 कोटी 70 लाख 63 हजार 655 रुपये
  5. एकतानगर गृहनिर्माण संस्था (आर/दक्षिण विभाग) – 34 कोटी 99 लाख 85 हजार 453 रुपये
  6. सखाराम महादेव पाटील (एच/पश्चिम विभाग) – 23 कोटी 87 लाख 73 हजार 48 रुपये
  7. आर. आर. डेव्हलपर्स (टी विभाग) – 19 कोटी 96 लाख 41 हजार 632 रुपये
  8. नंदनबाला कमर्शिअल्स प्रा. लि. (डी विभाग) – 16 कोटी 71 लाख 86 हजार 640 रुपये
  9. द व्हिक्टोरिया मिल्स लिमिटेड (डी विभाग) – 15 कोटी 47 लाख 93 हजार 76 रुपये
  10. ओबेरॉय रिअॅलिटी लिमिटेड (पी/दक्षिण विभाग) – 12 कोटी 84 लाख 55 हजार 663 रुपये

हेही वाचा – Mahalakshmi Yatra: प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रा सुरु, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -