घरठाणेभिवंडी महानगरपालिकेची बकरी ईदसाठी आढावा बैठक

भिवंडी महानगरपालिकेची बकरी ईदसाठी आढावा बैठक

Subscribe

महापालिका व पोलीस प्रशासन सज्ज 

 भिवंडी शहरामध्ये अनेक भाषिक नागरीक रहात असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भिवंडीमध्ये विविध भाषिकांचे सण, उत्सव मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरे केले जातात यामध्ये भिवंडी महापालिका व पोलीस प्रशासन पांच्या संयुक्तीकपणे मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश मुंबई महानगरपालिकेने ठरविलेल्या धोरणानुसार भिवंडीत दरवर्षीप्रमाणे येणारी मुस्लिम बांधवाची ईदनिमित्त लागणा-या अनेक प्रकारच्या महानगरपालिकेडील सेवा-सुविधा पुरविणेबाबत विविध कामांचे नियोजन करण्यासाठी महापालिका मुख्यालयामधील तिस-या मजल्यावरीत आयुक्तांच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये आढावा, नियोजन बैठक प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या अध्यक्षतेखाली, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या ऊपस्थितीत पार पडली.
बैठकीमध्ये आयुक्त म्हसाळ यांनी सांगितले की, भिवंडी शहरामध्ये अनेक धर्मियांचे सण, उत्सव आपण साजरे करताना त्यांना आवश्यक त्या सेवा सुविधा महापालिकेतर्फे पुरविल्या जातात त्यामुळे हे सर्व सण आजपर्यंत आनंदाने आणि मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. सद्या मुस्लिम धर्मियांच्या येऊ घातलेल्या बकरी ईद हा सणही आपण ब-याच वर्षांपासून याबाबतच्या आरोग्य, स्वच्छता, अपशिष्टांची वाहतूक पुरविणेकामी, मेहनताना तत्वावर मजूर पुरविणे वाहने ऊपलब्ध करणे, जनावरांचे डॉक्टरांची नियुक्ती करणे, वाहतुकीचा मार्ग निश्चित करणे, तात्पुरत्या स्वरुपांत मनपा पोलीस प्रशासनामार्फत कुर्बानी सेंटरना ना-हरकत देणे, पाणी पुरवठा करणे, औषध फवारणी करणे, हार्डवेअरचे साहित्य पुरविणे इ. अशा आवश्यक सेवा-सुविधा पुरविल्या जातात, हे महापालिकेचे कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याचे भान ठेऊन सर्व अडचणींवर मात करीत यावर योग्य उपाययोजना आखून नियोजनबध्द काम करून, सर्वांनी बकरी ईद सण गेल्या वर्षीप्रमाणेच आनंदात आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सज्ज रहावे अशा स्पष्ट सूचना त्यांनी उपस्थित अधिका-यांना यावेळी दिल्या.
त्यांनी पुढे सांगितले की, अपशिष्टांची विल्हेवाट स्लॉटर हाऊस या ठिकाणी केली जात असल्याकारणाने येथील रस्ता दुतर्फीकरण, दुरुस्तीने वाहतुकीसाठी पावसाळ्यापूर्वीच तयार करावा, यामुळे येथे वाहतुकीची समस्या येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच फक्त परवानगी दिलेल्या केंद्रावरच तपासणी केलेल्या जनावरांशिवाय इतर ठिकाणाहून कुर्बानीसाठी आलेली जनावरे व त्यांचे मांस बाहेरगावी नेणा-या व्यक्तींवर तात्काळ फौजदारीचे गुन्हे दाखल संबंधितांनी करावेत असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे. याप्रसंगी पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी भिवंडीतील नागरीकांना आवाहन करतांना सांगितले की, भिवंडीची सण, उत्सव साजरे करण्यांची एक वेगळी अशी परंपरा आहे, असे सण साजरे करतांना मा. उच्च न्यायालय, शासनाचे निर्देश, नियमांचे पालन करण्याची जबाबदारी आपणांसारख्या सर्व अधिका-यांची आणि नागरीकांचीही आहे. त्यामुळे कोणतीही कायदा, सुव्यवस्था
निर्माण होणार नाही याची काळजी सर्वांनी घेऊन, महापालिका व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे आणि अत्यंत शांततेने हा सण आपण पार पाडण्याची जबाबदारी स्विकारात अशी मला खात्री आहे. असेही त्यांनी म्हटले. बकरी ईद या सणाच्या बैठकीचे औचित्य साधून पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन महापालिकेच्यावतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उप-आयुक्त (आरोग्य) दिपक झिंजाड यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. बैठकीस शहर अभियंता सुनील घुगे, पशु संवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अजीत हिरवे मनपा सहाय्यक आयुक्त प्रिती गाडे, सरव पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक, मनपाचे प्रभाग समिती १ ते ५ चे प्रभाग अधिकारी, सर्व सबंधित विभाग प्रमुख कर्मचारी हजर होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -