Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी मोदी @ ९ हे अभियान लोकसभा मतदारसंघात व्यापक स्वरुपात राबविणार :  नारायण राणे

मोदी @ ९ हे अभियान लोकसभा मतदारसंघात व्यापक स्वरुपात राबविणार :  नारायण राणे

Subscribe

मोदी सरकारचा नऊ वर्षांचा कार्यकाल हा सुवर्णकाल आहे. जपान, जर्मनी यांना मागे टाकत आर्थिक विकासाच्या पहिल्या तीन देशांच्या क्रमवारीत भारत देश पोहोचणार आहे. म्हणजेच २०३० पर्यंत देश महासत्ता बनणार आहे.त्यामुळे पर्यायाने भारतातील जनता सुखी समाधानी बनणार आहे. ही देशाची प्रगती भारतीय जनता पार्टीचे (BJP) सरकार असताना होणार आहे. याचा अभिमान भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत आहे. त्या अनुषंगाने मोदी @९ हे अभियान लोकसभा मतदार संघात व्यापक स्वरूपात राबविले जाणार आहे, अशी माहीती केंद्रीय उद्योग मंत्री तथा मोदी @९ चे संयोजक नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिली.

नारायण राणे यांनी कुडाळ (Kudal) येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी मोदी @९चे सह संयोजक प्रमोद जठार, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, महीला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे आदी. पदाधिकारी उपस्थित होते.

८० कोटी गरिबांना धान्य देण्यासारखी योजना ६ मोदींनी राबविली

- Advertisement -

भारतीय जनता पार्टीची केंद्रात आणि राज्यात पुन्हा सत्ता येणार आहे. त्यासाठी लोकसभेला आणि विधानसभेला प्रत्येक जागेवर विजय मिळवायचा आहे. त्यासाठी वेगवेगळ्या बैठका घेत आहेत. ९ वर्षात मोदी सरकारने जनतेसाठी किती कामे केली. कोणकोणत्या विकास योजना राबविल्या. त्याचे लाभ कोणी कोणी घेतले. त्या लाभार्थींना भेटून त्यांना योजनेचे महत्व भाजपचा कार्यकर्ता सांगणार आहे. ८० कोटी गरिबांना धान्य देण्यासारखी योजना ६ मोदींनी राबविली. अनेक योजना सुरू केला. त्या घेवून आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत. पक्षाचा शेवटचा कार्यकर्ता लोक हिताचा कार्यक्रम घेवून शेवटच्या घटका पर्यंत पोहोचणार आहे.

देशासाठी भाजप किती महत्वाचे?

भाजपचे ध्येय धोरण देशाच्या सुरक्षिततेसाठी किती महत्वाचे आहे. हे जनतेला सांगणार आहेत आणि देशासाठी भाजप किती महत्वाचे हे जनतेला समजून सांगणार आहेत. त्याचप्रमाणे लोकहीताची कामे कशी केली आहेत आणि अजून कशी करावीत त्यासाठी जनता म्हणून तुमचे काही म्हणणे आहे काय किंवा समाजातील इतर घटकांचे म्हणणे ऐकून घेवून त्यांचे मार्गदर्शन ,तक्रारींचे म्हणणे काय आहे हे पक्ष, अध्यक्ष आणि नेते यांच्यापर्यंत पोहोचविणार आहेत. ९ वर्षात मोदी सरकारने केलेली कामे विकास, राबविलेल्या योजना आणि पुढील व्हिजन घेवून आम्ही जनतेमध्ये जाणार असल्याचे केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले. G-२०मुळे वेगवेगळ्या उपक्रमांना चालना मिळत आहेत. त्याचा देशाच्या विकासासाठी फार मोठा फायदा होत असल्याचेही राणे यांनी सांगितले.


- Advertisement -

हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराज द्रष्टे महानायक : राज्यपाल रमेश बैस


 

- Advertisment -