घरठाणेशिंदे गटाला धक्का देत उपनेते प्रकाश पाटील खासदारकीच्या रिंगणात?

शिंदे गटाला धक्का देत उपनेते प्रकाश पाटील खासदारकीच्या रिंगणात?

Subscribe

ठाणे जिल्ह्यातील शिंदे गटाचे उपनेते महाविकास आघाडीच्या वाटेवर

गेल्यावर्षभरापूर्वी झालेल्या राजकिय नाट्यानंतर शिंदे गटाचे शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी पुन्हा घरवापसी करत राष्ट्रवादीची वाट धरली. त्या पाठोपाठ शिंदे गटाचे उपनेते आणि खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील हे देखील भिवंडी लोकसभा उमेदवारी लढविण्याचा निर्धार करून चाचपणी करीत लवकरच महाविकास आ़घाडीच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघावर दोन वेळा निवडून आलेले विद्यमान केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटलांच्या विरोधात महाविकास आ़घाडीच्या माध्यमातुन प्रकाश पाटिल उमेदवारीची चाचपणी करीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाचे शिवसेना उपनेते असले तरी या गटाला येथील उमेदवारी नसल्याने एकवेळा हूकलेली संधी या वेळेस गमवायची नसल्याचा चंग बांधलेले उपनेते प्रकाश पाटिल महाविकास आघाडीत चाचपणी करीत वाट चोखळत असल्याचे दिसत आहे. ऐन दिपावलीच्या मुहूर्तावर त्यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचे उबाठा पदाधिकार्‍यांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. तर त्याच वेळेस त्यांनी राष्टवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची देखील भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेत भिंवंडी लोकसभा उमेदवारी साठी इच्छूक असून उमेदवारीसाठी इतर पक्षात जाण्याची परवानगी मागितल्याचे वृत्त आहे.

ही सगळी पार्श्वभूमी पाहता केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटलांना जोरदार टक्कर देणारा प्रकाश पाटलांसारखा लोकाभिमुख उमेदवार उतरविण्याचा काँग्रेसचा देखील मनसुबा असून जिल्हाभरात एकच वर्षात माजी आ. बरोरा पाठोपाठ उपनेत्याच्या रूपानं शिंदे गटाला घरघर लागल्या सारखे चित्र दिसून येत आहे, भाजपा विरोधातील जनमत व अंतर्गतवादवादी, ते राजकिय बदलाचा फटका सर्वात जास्त भाजपाला बसून येत असल्याची चिन्हे दिसून येत आहे. भिवंडी लोकसभेची जागाही गेल्या 10 वर्षा पासून भाजपाच्या ताब्यात आहे.परंतू भाजपातील उभी फुट चव्हाट्यावर येत असता भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी एकमेव उमेदवार हे खासदार व केंद्रीय पंचायतराज राजमंत्री पाटील यांच्याच नावाची तीस-यांदा शिफारस होणार यात दुमत नाही.परंतू मताच्या बेरजेच पाहिल तर 2024 च्या निवडणुकीत भाजपाला जनतेच्या रोषाला समोर जांव लागेल,अशी चर्चा तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. सन 2009 पासून इतरांची घरे फोडणारी भाजपा जिल्हयात मात्र फुटतानाचे चित्र दिसून येत आहे. या बाबत उपनेते प्रका़श पाटलांना संपर्क केला असता त्यांनी मात्र मौन पाळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -