घरठाणेउरण लोकल सुरु झाल्याचा आनंद, नागरिकांच्या खिशाला कात्री; द्राविडी प्राणायामावर उत्तराची मागणी

उरण लोकल सुरु झाल्याचा आनंद, नागरिकांच्या खिशाला कात्री; द्राविडी प्राणायामावर उत्तराची मागणी

Subscribe

या लोकल मार्गाने उरणचे नागरिक हे कामासाठी आणि विद्यार्थी शिक्षणासाठी नवी मुबई, मुंबईकडे येतात. या लोकलच्या मार्गामुळे उरणकरणाचा प्रवास सुखकारक होणार असल्याची अपेक्षा होती. पण उरण-खारकोपर लोकल मार्गाची स्थानक गाठणे हा प्रवास करण्यासाठी नागिरकांसाठी अधिक खर्चिक होत आहे.

उरण : गेल्या दोन दशकापासून उरणमध्ये राहणारे नागरिक हे उरण-खारकोपर लोकल मार्गाची प्रतिक्षा करत होते. अखेर उरण-खारकोपर लोकल मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारीला करण्यात आले. या लोकल मार्गाने उरण तालुक्यात राहणाऱ्या शहरी आणि ग्रामीण भाग हा नवी मुंबई शहराशी जोडला गेला आहे. पण या लोककच्या स्थानक गाठण्यासाठी नागरिकांचे जास्त पैसे खर्च होत असून रेल्वे स्थानक परिसरात परिवहनच्या बस सेवा सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

या लोकल मार्गाने उरणचे नागरिक हे कामासाठी आणि विद्यार्थी शिक्षणासाठी नवी मुबई, मुंबईकडे येतात. या लोकलच्या मार्गामुळे उरणकरणाचा प्रवास सुखकारक होणार असल्याची अपेक्षा होती. पण उरण-खारकोपर लोकल मार्गाची स्थानक गाठणे हा प्रवास करण्यासाठी नागिरकांसाठी अधिक खर्चिक होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – BJP : दुर्योधन – शकुनी मामाच्या कपटामुळे महाभरत घडले; भाजपचा ‘महापत्रकार’ परिषदेवर निशाणा

रेल्वे स्थानक गाठण्यासाठी असा करावा लागतो प्रवास

न्हावा-शेवा रेल्वे स्थानक जवळ असले, तरी द्रोणगिरी-नोडमध्ये नागरिकांना बोकडविरा गावाच्य हद्दीत असणारे हे रेल्वे स्थानक जवळ पडत आहे. तर उरण पूर्वी विभाग ते नवघर गावाच्या हद्दीत असणाऱ्या न्हावा-शेवा स्टेशन येथील रिक्षाचे भाडे शेअरिंगमध्ये तब्बल 30 रुपये खर्च आहे. या प्रवासासाठी एकट्या व्यक्तीला लोकलच्या प्रवासाठी 100 रुपये खर्च करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर परिवहनच्या बस सुरू करण्याची मागणी उरणकरांकडून होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : आज प्राणप्रतिष्ठा विधीचा दुसरा दिवस; रामल्लाच्या मूर्तीचे मंदिर परिसरात आगमन

परिवहन बस सेवा सुरू कराव्या; नागरिकांची मागणी

उरण परिसरात नवीन लोकल रेल्वे सुरू झाली आहे. मी उरण पूर्व विभागातून लोकल रेल्वेने प्रवास करत असून रेल्वे स्थानक गाठण्यासाठी 60 रुपये खर्च करावा लागत आहे. हा खर्च मला परवडत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातून परिवहनच्या बस सेवा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवासी तुषार पाटील यांनी केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -