घरthaneशिवसेना शिंदे गटाकडून भाजपा प्रदेश अध्यक्षांचे डोंबिवलीत जंगी स्वागत

शिवसेना शिंदे गटाकडून भाजपा प्रदेश अध्यक्षांचे डोंबिवलीत जंगी स्वागत

Subscribe

शिवसेना आणि भाजपातील वादावर पडदा

भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मिशन २०२४ महाविजय संपर्क अभियानसाठी रविवारी डोंबिवलीच्या दौर्‍यावर आले होते आहेत. या दौर्‍यात ते संपूर्ण कल्याण लोकसभा  मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून याच कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेना आणि भाजपा मध्ये वाद सुरु होता. मात्र या दौर्‍यावर आलेल्या भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. शिवसेना आणि भाजपा मधील वादावर पडदा पडला का? असा सवाल करणारी चर्चा सुरू झाली आहे.

भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत दौर्‍यावर आहेत. शनिवारी त्यांनी कल्याण पश्चिम येथील टिळक चौकात त्यांनी एक सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधला. या सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी  केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, शहर अध्यक्ष वरूण पाटील यांच्यासह  मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. मात्र बावनकुळेच्या या सभेदरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे देखील दाखवत निषेध नोंदविला.

- Advertisement -

कल्याणचा दौरा आटोपल्यानंतर रविवारी चंद्रशेखर बावनकुळे डोंबिवलीत दाखल झाले.  त्यांनी भाजपच्या मिशन विजय २०२४ साठी अप्पा दातार चौकात सभा घेत नागरिकांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.विशेष म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे डोंबिवलीत आल्यावर शिवसेना मध्यवर्ती शाखेत शिवसेना शिंदे गटाच्यावतीने  उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आणि शहरप्रमुख राजेश मोरे आणि इतर पदाधिकार्‍यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, आमदार संजय केळकर आदी उपस्थित होते.

कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप आणि टीका टिपण्णी आता थांबली असली तरी धुसफूस अजूनही सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या घरी आले असता त्यांच्यासमोर भाजपच्या जिल्हा अध्यक्ष आणि स्थानिक नेत्यांनी शिंदे गटाच्या विरोधात आपली व्यथा मांडली. भाजप नेत्यांना आणि माजी नगरसेवकांना कशा प्रकारे प्रशासनाकडून दुजाभाव केला जात आहे, त्यांना डावलले जात आहे, याची सर्व माहिती त्यांनी देवेंद्र फडणीस यांच्यासमोर मांडली. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू असताना डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांकडून भाजपा प्रदेशाध्यक्षांचे स्वागत केल्यानंतर या दोन्ही पक्षातला वादावर पडदा पडला का? असा सवाल उपस्थित करणारी एकच चर्चा रंगली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -