घरthaneचार घटनांमध्ये सव्वा सहा लाखांच्या मुद्देमालाची चोरी

चार घटनांमध्ये सव्वा सहा लाखांच्या मुद्देमालाची चोरी

Subscribe

भिवंडी शहरात शनिवारी, रविवार या दोन्ही दिवसात एकूण घरफोडीचे चार गुन्हे दाखल झाले असून यामध्ये एका मंदिराचा समावेश आहे. एका यंत्रमाग कारखान्यासह दोन दुकानांमध्ये घरफोडी झाले आहे. शहरातील न्यू आझाद नगर येथे सोरटी सोमनाथ शिवमंदिर असून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मंदिराच्या मागील भिंतीवरून चोराने मंदिराच्या आवारात प्रवेश केला आणि मंदिराच्या मुख्य दरवाजास असलेल्या कडी कोयंड्याचे स्क्रू खोलून मंदिरात प्रवेश केला. त्याने मंदिरातील दानपेटी तोडून त्यामधील रोख रक्कम आणि वस्तु तसेच मंदिराबाहेरील पितळी धातूची घंटा आणि सिलींग फॅन, मंदिराचे स्लॅबवर ठेवलेले पत्रे असा एकूण 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला आहे. मंदिराचे व्यवस्थापक देवानंद गौड यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील मानकोली नाका येथे दापोडे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या हरिहर कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलात भवानी हार्डवेअर अँड इलेक्ट्रीक नावाचे दुकान आहे. या दुकानात दिनांक 22 आणि 23 ऑक्टोबर दरम्यान दुकानाच्या मागील भिंती वरील सिमेंटची खिडकी तोडून तेथे शिडी लावून दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी दुकानाचे काऊंटर मधील रोख रक्कम आणि दुकानात विक्रीसाठी ठेवलेले सिलींग फॅन, वायर बंडल, पाण्याची मोटर, एमसीबी बटन स्विच असे 4 लाख 71 हजार 78 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. दुकान मालक अर्जुनसिंग वक्तावरसिंग राजपुरोहीत यांनी चोरीस गेलेल्या मालाबाबत दुकानातील खरेदी विक्रीची बिले पडताळणी व खात्री केल्या नंतर रविवारी नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -