Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग april fool day 2021: कशी झाली सुरूवात, इतिहास काय?

april fool day 2021: कशी झाली सुरूवात, इतिहास काय?

Related Story

- Advertisement -

‘एप्रिल फूल’ बनवणे हे आपल्यासाठी काही नवीन राहिले नाही. आपण कोणाला घाबरण्यासाठी, मज्जा मस्ती करण्यासाठी अनेकांना मूर्ख बनत असतो. मात्र १ एप्रिल हा दिवस विशेष करुन अनेकांना मुर्ख बनत आनंद मिळण्यासाठी साजरा केला जातो. अनेक गमतीजमती या दिवसात घडतात. जगभरात हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

परंतु नेमका एप्रिल फूल साजरा करण्यामागचा उद्देश किंवा संपल्पना आजही स्पष्ट झालेली नाही. पण लहानांपासून वृद्धांपर्यंत या दिवसाचा आनंद घेतात. एप्रिल फूल या दिवसाचा संबंध वसंत ऋतुशी जोडला जातो. कारण वसंत ऋतुच्या सुरुवातीचा हा पहिला दिवस असतो. या वसंत ऋतुच्या आगमानाने निसर्गात अनेक बदल होता. हे निसर्गाचे अदभुत बदल अनेकांनाच भुरळ पाडणारे असतात.

- Advertisement -

अनेक इतिहासकारांच्या मते, एप्रिल फूल या दिवसामागे जवळपास ४३८ वर्षांपेक्षा अधिकचा इतिहास आहे. १५८२ या वर्षात फ्रान्स देशाने ज्यूलियन कॅलेंडर नाकारत ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले. ज्यूलियन कॅलेंडरचे नवीन वर्ष हे १ एप्रिलपासून सुरु होत होते. परंतु फ्रान्सने स्वीकारलेले ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्ष हे १ जानेवारीपासून सुरु झाले. त्यामुळे असे म्हटले जाते की, या कॅलेंडरमधील बदल लोकांना समजणे कठीण झाले होते. त्यामुळे फ्रान्स नागरिकांनी १ एप्रिल या दिवशीच नवीन वर्षे साजरा केला. हे सेलिब्रेशन मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु व्हायचे ते १ एप्रियपर्यंत चालू असायचे. यामुळे ते गमतीचे पात्र ठरू लागले. आणि यानंतरच त्यांना एप्रिल फूल (April Fools) साजरा केला जाऊ लागला.

इतिहासकारांनी एप्रिल फूल दिवसाचा संबंध हिलेरिया (Hilaria)शी जोडला जातो. हिलेरिया हा एक लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ आनंदी (Joyful) असा होतो. प्राचीन रोम देशात हिलेरिया हा दिवस नागरिक सणाप्रमाणे साजरा करतात. हा सण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जायचा. यात लोक एकमेकांना मुर्ख बनवत आनंद साजरा करायचे.

- Advertisement -

April Fools’ Day हा दिवस आपण आनंद आणि मज्जीमस्तीसाठी साजरा करत असलो तरी यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तसेच एप्रिल फूल साजरा करण्याच्या नादात आपल्याकडून या कोरोनाच्या संसर्गाच्या काळात काही चुकीची माहिती समाजात पसरणार याचा भान ठेवा.


हेही वाचा- सावधान! एप्रिल फुल करणे पडणार महागात


 

- Advertisement -