घरट्रेंडिंगFacebook डाऊन झाल्यावर, पाहा पुढे काय झालं...

Facebook डाऊन झाल्यावर, पाहा पुढे काय झालं…

Subscribe

#Facebookdown हा हॅशटॅग वापरुन नेटिझन्सनी सोशल मीडियावर विनोदी Memes ची बरसात सुरु केली आहे.

एखाद्या गोष्टीला इंटरनेटवर ट्रोल करणं, हा प्रकार काही आजकाल नवीन नाही. एखाद्या सेलिब्रिटीकडून किंवा जगविख्यात कंपनीकडून छोटीशी चूक झाली तर लगेच त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. त्यांच्यावर विनोदी Memes बनवले जातात आणि ते व्हायरल केले जातात. दीपिका आणि रणवीर यांच्यावर बनवण्यात आलेले Memes याचं ताजं उदाहरण आहे. मात्र, सध्या मिम्स बनवणाऱ्यांच्या टार्गेटवर Facebook आलं आहे. गेल्या काही वेळापासून जगभरात फेसबुक आणि इन्स्टाग्राम सर्व्हर डाऊन झाल्यामुळे, युजर्स चांगलेच त्रस्त झाले आहेत. Facebook आणि Instagram वापरता येत नसल्यामुळे जगभरातील नेटिझन्स हैराण झाले आहेत. दरम्यान, नेटिझन्सनी त्यांची नाराजी सोशल मीडियावरुन व्यक्त केली आहे. फेसबुक डाऊन झाल्याच्या मुद्द्यावरुन नेटिझन्सनी विनोदी आणि मार्मिक Memes ची निर्मीती केली आहे. #Facebookdown हा हॅशटॅग वापरुन नेटिझन्सनी सोशल मीडियावर विनोदी Memes ची बरसात सुरु केली आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे सर्व्हर्स जरी डाऊन झाले असले तरी, ट्वीटरच्या माध्यमातून हे Memes व्हायरल केले जात आहेत. या मिम्सना जगभरातील लोकांची पसंती मिळते आहे. गेल्या काही वेळापासून फेसबुकचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे फेसबुकवर फोटो, स्टेटस किंवा व्हिडिओ कोणत्याच प्रकारची पोस्ट अपलोड होत नाहीये.

दरम्यान, काही भागात आणि काही सर्व्हर्सना मात्र फेसबुक आणि इन्स्टाग्राम व्यवस्थित सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. साधारण गेल्या अर्ध्या तासापासून फेसबुक व इन्स्टाग्राम क्रॅश झाल्याचा मेसेज व्हायरल होतो आहे. त्यामुळे जगभरातील फेसबुक आणि इन्स्टा फॅन्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -