घरटेक-वेकपालकांनो मुलांना सुरक्षित इंटरनेट वारण्याचे धडे द्या; गुगलचा नवा उपक्रम

पालकांनो मुलांना सुरक्षित इंटरनेट वारण्याचे धडे द्या; गुगलचा नवा उपक्रम

Subscribe

इंटरनेटचा वापरामध्ये जास्तीत जास्त सकारात्मकता आणून नकारात्मकतेला दूर कसे ठेवावे, याचे धडे गुगलकडून देण्यात येणार आहेत. सुरुवातील हा उपक्रम अमेरिकेपुरता मर्यादित आहे.

इंटरनेट, सोशल मीडियासोबत आता सर्रास वापरला जाणार शब्द म्हणजे फेक न्युज… जगभरात कोट्यवधी इंटरनेट वापरकर्ते असून कोणत्याही कोपऱ्यातल्या व्यक्तीला इंटरनेटचे मायाजाल खुले असते. चिथावणीखोर कटेंट किंवा असंवेदनशील कटेंटला कसे टाळावे, याबाबत लहान मुलांमध्ये ऑनलाईन सुरक्षा आणि सकारात्मकतेबाबत जास्तीत जास्त जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी गुगलने एक उपक्रम जाहीर केला आहे. गुगल सध्या अमेरिकेतील राष्ट्रीय पालक-शिक्षक संघटना (National PTA) आणि डोनर्सचुझ.ऑर्ग (DonorsChoose.org) या एनजीओसोबत एकत्र येऊन संयुक्तरित्या हा उपक्रम चालवणार आहे. ‘Be Internet Awesome’, असे या उपक्रमाचे नाव असून यामाध्यमातून पालकांसाठी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. नवीन इंटरनेट युजर्सना सोशल नेटवर्कींग साईट आणि इंटरनेटवरील नकारात्मक कटेंटवर काय प्रतिक्रिया द्यावी किंवा असा कटेंट समोर आल्यास काय करावे? याबद्दलची साक्षरता वाढवण्यासाठी गुगलने सदर उपक्रम हाती घेतला असल्याचे सांगितले आहे. सध्या हा उपक्रम अमेरिकेतच राबवला जाणार असून इतर देशांमध्ये हा उपक्रम कधी येणार? याबाबत गुगलने अजून खुलासा केलेला नाही.

एका रिसर्चनुसार पालकांना आपल्या मुलांना इंटरनेटवर कसे सुरक्षित रहावे हे सांगायचे असते. मात्र याबाबत संवाद कसा साधावा, याबाबत अनेक पालक अनभिज्ञ असतात, असे गुगलचे कर्मचारी ज्युलियन यी यांनी सांगितले. बी इंटरनेट ऑसम या उपक्रमात ज्युलियन यांचाही सहभाग आहे. “या शिबिरासाठी आम्ही माहितीचा एक संच तयार केला आहे, शिबिरादरम्यान हे संच पालकांना दिले जातील. जेणेकरून ते इतरांना डिजीटल सेफ्टी आणि उत्पादनक्षम चर्चा कशी करावी, याबाबत माहिती देऊ शकतील.” हा उपक्रम ऑक्टोबर महिन्यातच सुरू होणार आहे. कारण ऑक्टोबर महिना हा राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागृती म्हणून साजरा केला जात असतो.

- Advertisement -

या उपक्रमात सहभागी होणाऱ्या शाळांमधील पालक आणि विद्यार्थ्यांना मोफत गुगल पिक्सलबुक लॅपटॉप देण्यात येणार आहे. त्याचबरोबर इंग्लिश आणि स्पॅनिश भाषेतील सादरीकरणाचे साहित्य देण्यात येणार आहे. ऑनलाईन सुरक्षा, सकारात्मक डिजीटल अनुभव, कुंटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन इंटरनेटचा वापर कसा करावा? याबाबत जागृती केली जाणार आहे. अमेरिकेच्या प्रत्येक राज्यातून ज्या पालक-शिक्षक संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत, त्यांना गुगलकडून तब्बल एक हजार डॉलरचे अनुदान दिले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -