घरट्रेंडिंग#MeToo ला सेलिब्रिटींचा वाढता पाठिंबा!

#MeToo ला सेलिब्रिटींचा वाढता पाठिंबा!

Subscribe

भारतात मी टू कॅम्पेनला सुरूवात झाली असून तनुश्री दत्तानंतर आता कितीतरी सेलिब्रिटी आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडत आहेत. तर हे कॅम्पेन स्वागतार्ह असल्याच्या प्रतिक्रिया नामवंत महिलांनी दिल्या आहेत.

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने स्वतःवर झालेल्या छेडछाडीच्या प्रकरणाला वाचा फोडली. तिने दहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा उल्लेख करत अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर आरोप केला. तिच्या या धाडसाचे काहींनी कौतुक केले, तर काहींनी तिला खोटं देखील ठरवलं. मात्र या प्रकरणामुळे जगभरात राबवली जाणारी #MeToo कॅम्पेनची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. या माध्यमातून सोशल मीडियावर आपल्यासोबत झालेल्या गैरप्रकारांची माहिती महिला देतात. जे तुमच्यासोबत झाले, ते माझ्यासोबत झाले होते. त्यामुळे मी टू असे या कॅम्पेनला म्हटलं जात आहे. या संकल्पनेला महिलांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अभिनेत्री सोहा अली खान हिने देखील या माध्यमाचे स्वागत केले आहे.


तर केंद्रीय महिला आणि बालकल्याण विकास मंत्री मनेका गांधी यांनी पुन्हा एकदा मी टू कॅम्पेन भारतात सुरू झाल्याबाबत आनंद व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

मी टू  च्या कचाट्यात हे सेलिब्रिटी

मी टू च्या माध्यमातून नवनवीन खुलासे लोकांच्या समोर येत आहेत. अभिनेत्री कंगना रनौतने क्वीन चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांच्यावरही छेडछाडीचा आरोप लावला असून गायक कैलाश खैर यांच्यावरही महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याशिवाय काहींनी आपल्यावरील आरोपाबाबत जाहीर माफी मागितली आहे. अभिनेता – दिग्दर्शक रजत कपूर यांनी आपल्या ट्वीटर अकांउटवरून एका महिला पत्रकाराची माफी मागितली आहे. तर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला असून विकास बहलवरील आरोपावर त्यांचे फँटम फिल्म्सचे दुसरे पार्टनर विक्रमादित्य मोटवाने यांनी माफी मागितली आहे. तसेच आपल्या चित्रपटांच्या सेटवर महिलांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल, अशी हमीदेखील त्यांनी दिली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -