घरट्रेंडिंगअसं वागला असेल तर साजिदला प्रायश्चित घ्यावं लागेल - फराह खान

असं वागला असेल तर साजिदला प्रायश्चित घ्यावं लागेल – फराह खान

Subscribe

जर माझ्या भावाने चुकीचे काही केले असेल आणि जर तो खरचं तस वागला असेल तर त्याला त्याचे प्रायश्चित घ्यावं लागेल. असे मत फराह खानने व्यक्त केले आहे.

काही दिवसांपूर्वी साजिद खानवर दोन अभिनेत्रींनी आणि एका महिला पत्रकाराने #MeToo म्हणत त्याच्यावर आरोप केला होता. या आरोपानंतर साजिद खानची बहिण आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शीका फराह खान हिने आपले मौन सोडत यावर आपले मत स्पष्ट केले आहे. जर माझ्या भावाने चुकीचे काही केले असेल आणि जर तो खरचं तस वागला असेल तर त्याला त्याचे प्रायश्चित घ्यावं लागेल. असे मत फराह खानने व्यक्त केले आहे.

साजिद खानवर आरोप

पत्रकार करिश्मा उपाध्याय हिने काही दिवसांपूर्वी साजिद खानवर गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला होता. करिश्मा उपाध्यायने आरोप केल्यानंतर अभिनेत्री सलोनी चोपडा आणि रेचल व्हाइट या दोघींनीही #MeToo म्हणत साजिदवर लैंगिक अत्याचार केल्याचा या तिघींनी आरोप केला होता. साजिदने कपडे काढण्याची मागणी केली होती असा आरोप रेचल व्हाइटने केला होता. या आरोपाचं गांभीर्य लक्षात घेत साजिद खानने हाउसफुल्ल ४ या चित्रपटातून एक्झिट देखील घेतली होती.

- Advertisement -

असे म्हणाला साजिद

रेचल व्हाइटने आरोप केल्यानंतर साजिद खानने चित्रपटातून एक्झिट तर घेतली. तसेच आपण निर्दोष आहोत हे लवकरच सिद्ध देखील करु असंही स्पष्ट केले आहे.

बहिणीने मौन सोडले

आपल्या भावावर आरोप होताच त्याची बहिण फराह खानने मौन सोडले आहे. आज जी काय वेळ आली आहे त्यामुळे माझ्या कुटुंबाला अस्वस्थ करुन सोडणारी आहे. आम्हाला अत्यंत कठीण समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जर माझा भाऊ खरचं असं वागला असेल तर त्याला त्याचे प्रायश्चित मिळेल. तसेच मुलींसोबत असं काही झालं असेल तर त्या सर्वांच्या खंबीरपणे पाठीशी उभी आहे. असे ट्विट फराहने केलं आहे.

- Advertisement -

वाचा – ‘साजिदने मला कपडे काढायला लावले’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -