घरट्रेंडिंगसरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा, पगार सात दिवसांचा का? - बच्चू कडू

सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा, पगार सात दिवसांचा का? – बच्चू कडू

Subscribe

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसांच्या आठवड्यावरुन मंत्री बच्चू कडू यांनी सरकारलाच प्रश्न विचारला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयावर मंत्री बच्चू कडू यांनी आक्षेप घेत जोरदार टीका केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा तर पगार सात दिवसांचा का द्यायचा असा प्रश्नच मंत्री बच्चू कडू यांनी सरकारला केला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसांच्या आठवड्यावरुन मंत्री बच्चू कडू यांनी सरकारलाच प्रश्न विचारला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयावर मंत्री बच्चू कडू यांनी आक्षेप घेत जोरदार टीका केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा तर पगार सात दिवसांचा का द्यायचा असा प्रश्नच मंत्री बच्चू कडू यांनी सरकारला केला आहे. राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय येत्या २९ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. या निर्णयावरून बच्चू कडू यांनी आपल्या सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं की, ” कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग सध्या मिळतोच आहे. चांगले काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी कितीही दिवसांचा आठवडा केला तरी चालेल. पण, ज्या कर्मचार्‍यांच्या टेबलवरून महिनोंमहिने फाईल सरकत नाही, त्यांना कशासाठी फायदा मिळू द्यायचा? ” असा सवाल कडू यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी ५ दिवसांचा आठवडा करण्याची मागणी केली होती. ही मागणी महाविकास आघाडीच्या सरकारने मान्य करत पूर्ण केली आणि पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. दरम्यान, कामासाठी फक्त पाच दिवसांचा आठवडा जरी देण्यात आला असला तरी, सरकारी कर्मचाऱ्यांना काही नियम पाळणं गरजेचं आहे.

ठाकरे सरकारचे मंत्रिमंडळातील निर्णय –

शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी ५ दिवसांचा आठवडा. २९ फेब्रुवारीपासून
इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव आता “बहुजन कल्याण विभाग”
बाल न्याय निधी गठीत करण्यास मान्यता. २ कोटींची तरतूद
राज्याच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -