घरट्रेंडिंगवेट्रेसला मिळाली ३ लाखांची टीप, मात्र रेस्टॉरंट मालकाने टाकले कामावरून काढून, जाणून...

वेट्रेसला मिळाली ३ लाखांची टीप, मात्र रेस्टॉरंट मालकाने टाकले कामावरून काढून, जाणून घ्या कारण

Subscribe

अमेरिकेत एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या महिला वेट्रेसला १००, २०० नाही तर तब्बल साडे तीन लाखांची टीप मिळाली. टीप म्हणून एवढी मोठी रक्कम मिळाल्याने या वेट्रेसच्या आंनदाला पारा उरला नाही. मात्र या टीपमुळे तिची नोकरी धोक्यात आली. इतकेच नाही तर रेस्टॉरंट मालकाने तिला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र असे का झाले जाणून घेऊ…

डेली मेलच्या वृत्तानुसार, रयान ब्रांड्ट असे या वेट्रेसचे नाव असून ती अर्कांससमध्ये राहते. रयान बेंटोविल स्थित एका रेस्टॉरंटमध्ये वेट्रेसचे काम करते. मात्र काही दिवसांपूर्वी एका बिजनेस मॅनने तिला सर्विसच्या बदल्यात १००, २०० नाही तर तब्बल साडे तीन लाख इतकी मोठी रक्कम टीप म्हणून दिली. मात्र रयान ब्रांड्टच्या या टीपचा आनंद फार काळ टिकला नाही कारण रेस्टॉरंट मालकाने ही टीप रेस्टॉरंटमधील इतर वेट्रेससोबत वाटून घेण्यास सांगितली. हे ऐकून रयानला आर्श्चयचं वाटले. कारण यापूर्वी कधी तिला अशाप्रकारे टीप शेअर करुन घेण्यास सांगितले नव्हते.

- Advertisement -

वेट्रेसवर विश्वास ठेवला तर रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने पॉलिसीच्या बहाण्याने तिला टीपचे पैसे वाटून देण्यास सांगितले. परंतु रयान ब्रांड्सने ही गोष्ट टीप देणाऱ्या व्यक्तीला जाऊन सांगितली. ही बाब रेस्टॉरंट मॅनेजरला समजली यानंतर तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

टीप देणाऱ्याने केली मदत

- Advertisement -

या घटनेनंतर टीप देणाऱ्या व्यावसायिकाने वेट्रेस रयानला मदतीसाठी हात पुढे केला. त्यांनी GoFundme नावाचे एक पेज सुरु केले. या पेजद्वारे त्यांनी लोकांना रयानला नोकरी गेल्यानंतर शैक्षणिक कर्जाची परतफेड करण्यास मदत मागितली.

रयान ही एक विद्यार्थी असून त्याच्यावर लाखो रुपयांचे शैक्षणिक कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी ती वेट्रेस म्हणून काम करत होती. मात्र अचानक तीन लाखांची टीप मिळाल्याने आपण शैक्षणिक कर्ज फेडू शकतो असे तिला वाटले. मात्र रेस्टॉरंट मालकाने टीप अन्य वेट्रेससोबत वाटून घेण्यास सांगितल्य़ाने ती चिंतेत पडली. यावेळी तिने ही बाब टीप देणाऱ्याला सांगितली त्यामुळे रयानला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. मात्र टीप देणाऱ्या व्यक्तीने तिला मदतीचा हात पुढे केला आणि शैक्षणिक कर्ज फेडण्यास मदत केली.


Omicron variant : ओमिक्रॉन वेगाने वाढतानाच, लसीच्या कार्यक्षमतेवरही परिणाम करतोय, WHO ची माहिती


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -