घरताज्या घडामोडीकोरोना काळात हजार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणारा शाळा मालक

कोरोना काळात हजार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणारा शाळा मालक

Subscribe

शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना त्यांनी परवडेल तितकी फी भरा

कोरोना काळात शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरु झाले. या काळात मुले शाळेत गेली नाहीत. संपूर्ण अभ्यास तसेच परीक्षा देखील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन दिल्या. मात्र अनेक शाळांनी या काळात विद्यार्थी आणि पालकांच्या मागे फीसाठी तगादा लावला. शाळांच्या या मनमानी कारभारावर अनेकांनी आवाज उठवले. त्यामुळे शाळा प्रशासन आणि पालकांमधील वाद शिगेला पोहचला होता. राज्यभर असे प्रकार घडत असताना मुंबईत मात्र एका दिलदार शिक्षकाने तब्बल एक हजार विद्यार्थ्यांची वर्षभराची फी माफ करून सर्वासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या हुसेन शेख यांना श्रीमंत मनाचा शाळा मालक म्हणून संबोधण्यात येत आहे. (Principal Hussein Sheikh owner of Holy Star English School provided free education to thousands of students during the Corona period)

हुसेन शेख मुंबई मालवणी भागातील होली स्टार इंग्लिश स्कूलचे मालक आहेत. प्राचार्य हुसेन शेख यांनी शाळेतील एक हजार विद्यार्थ्यांची फी माफ केली आहे.  तर शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना त्यांनी परवडेल तितकी फी भरा असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे हुसेन हे शाळेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत अन्नधान्यांचा पुरवठा करत आहेत. शाळेतील एकही विद्यार्थी उपाशी राहता कामा नये असे हुसेन यांचे मत आहे. कोरोना काळात लोक आर्थिक गोष्टींचा सामना करत असताना हुसेन शेख यांनी शाळेसाठी इतकी मोठी मदत करण्यासाठी आपल्या बायकोचे दागिने आणि मुलीची एफडी देखील मोडली आहे. दागिने आणि एफडी मोडून आलेल्या ८ लाख रुपयांमधून १ हजार विद्यार्थ्यांची फी माफ करुन अविरत शाळा सुरु ठेवली.

- Advertisement -

हुसेन खान यांनी शाळेला आणि गरजूंना मदत केल्यानंतर इतरांना देखील मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी शाळेबाहेर ‘सपोर्ट फॉर स्टूडंट’ असा डोनेशन बॉक्स बसविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हुसेन यांनी शाळेतील शिक्षकांना देखील काही काळ कमी पगारात नोकरी करण्याची विनंती केली आहे. हुसेन शेख यांच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


हेही वाचा – Coronavirus : अमेरिकेकडून कोरोनाविरोधी ‘मुंबई मॉडेल’चे कौतुक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -