घरगणेशोत्सव २०२०Ganeshotsav2020: तुम्हाला बाप्पाच्या पुत्रासह कुटुंबीयांबद्दल माहिती आहे का? जाणून घ्या...

Ganeshotsav2020: तुम्हाला बाप्पाच्या पुत्रासह कुटुंबीयांबद्दल माहिती आहे का? जाणून घ्या…

Subscribe

२२ ऑगस्ट, शनिवार रोजी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला पहिले पूज्य आराध्य देव गणेशाचे जन्मोत्सव गणेश चतुर्थीच्या रूपात साजरे करण्यात आला आहे. हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो आणि घरा-घरात गणपतीची स्थापना केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते. सर्व भाविक पूजा करून गणपतीला प्रसन्न करण्यासाठीची इच्छा बाळगतात. मात्र आता पर्यंत तुम्ही फक्त गणपती बाप्पाची आई पार्वती आणि वडिल म्हणजे पिता महादेव यांविषयी ऐकले असेल. मात्र आता गणपती बाप्पाच्या कुटुंबांबद्दल जाणून घेऊया…

- Advertisement -

गणपतीचे भावंड

गणपतीच्या कथेच्या माध्यमातून आपल्याला श्री कार्तिकेय हा गणपतीचा मोठा भाऊ हे ठाऊक होते. मात्र त्याला सुकेश, जलंधर, अयप्पा आणि भूमा असे इतर भावंड देखील आहेत, असे सांगितले जाते. तर गणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी महादेव आणि पार्वतीची मुलगी असल्यामुळे गणपतीची बहिण असे मानले गेले. हिचा विवाह राजा नहुष यांच्यासोबत झाला होता.

गणपतीच्या पत्नी

साधारणतः आख्यायिकानुसार गणपतीच्या दोन पत्नी रिद्धी आणि सिद्धी या दोघीच माहित असतील परंतु, तृष्टि, पुष्टि आणि श्री या देखील गणपतीच्या पत्नी असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

गणपतीचे पुत्र

गणपती बाप्पाचे गोंडस रूप असल्याने अनेकांना तो लहान, गोड आणि बालिश वाटतो. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, गणपती बाप्पाचे दोन पुत्र लाभ आणि शुभ असल्याचे सांगितले जात असून आमोद आणि प्रमोद हे नातू आहेत.

गणपती बाप्पाविषयी आणखी काही…

गणपती बाप्पाला जल तत्वाचे अधिपती मानले जात असून त्याला लाल रंगाचे जास्वंद अतिप्रिय मानले जाते तर दुर्वा, शमी पत्र हे देखील प्रिय आहे. त्याचे पाश आणि अंकुस हे प्रमुख अस्त्र असल्याचे सांगितले जात आहे. गणपती बाप्पाचे वाहन पिटुकला उंदिर असल्याचे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. मात्र मूषक म्हणजे उंदरासह सिंह आणि मोर हे देखील त्याचे वाहन आहे.


Ganeshotsav 2020: …म्हणून उंदीर गणपती बाप्पाचे वाहन झाला
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -