Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ दहिसरमध्ये ३ घरं कोसळली, एकाचा मृत्यू

दहिसरमध्ये ३ घरं कोसळली, एकाचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

मुंबईत पहिल्याच पावसानंतर बुधवारी रात्री मालाडमध्ये मोठी इमारत दुर्घटना घडली. त्यापाठोपाठ आता दहिसरमध्येही तीन घरं कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चव्हाण चाळ शंकर मंदिराजवळ केतकीपाडा दहिसर पूर्व या ठिकाणी ही दुर्घटना घडली असून घराखालची माती सरकल्यामुळे ३ घरं कोसळल्याची माहिती समोर येत आहे. यात प्रद्युम्न सरोज नावाच्या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल झाले असून त्यांच्याकडून बचावकार्य सुरु आहे.

- Advertisement -