घरCORONA UPDATEcorona vaccine booking:पेटीएम, इंफोसिससह १५ कंपन्या देणार ऑनलाईन वॅक्सिन बुकिंगची सुविधा

corona vaccine booking:पेटीएम, इंफोसिससह १५ कंपन्या देणार ऑनलाईन वॅक्सिन बुकिंगची सुविधा

Subscribe

प्रवासादरम्यानही मिळणार ही सुविधा

कोरोनापासून वाचण्यासाठी आता नागरिक लस घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु लस घेण्यापूर्वी नागरिकांना CoWin App वर ऑनलाईन बुकिंग करणे बंधनकारक आहे. यात देशातील लोकसंख्या आणि एकूणच कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता लसीच्या बुकिंगसाठी उपलब्ध असलेले प्लॅटफॉ़र्म कमी पडत आहेत. त्यामुळे आता डझनभर ऑनलाईन कंपन्या आपल्या प्लॅटफॉर्मवरुन लसीकरण बुकिंग सुविधा देण्यासाठी पुढे आल्या आहेत. परंतु या कंपन्या आता केंद्राच्या मंजुरी वाट पाहत आहे. यामध्ये पेटीएम आणि मेक माय ट्रिप यांसारख्या मोठ्या डिजिटल कंपन्यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती कोविनचे ​​(CoWin) प्रमुख आरएस शर्मा यांनी दिली.

सरकारने गेल्या महिन्यात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली होती. या मार्गदर्शन सुचनेत लसीकरण बुकिंग सुविधेत सुलभता आणण्यासाठी CoWin App ला इतर ऑनलाईन कंपन्यांशी हातमिळवणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यानंतर पेटीएम, मेक माय ट्रीप आणि इंफोसिससह जवळपास १५ कंपन्यांनी आपल्या अधिकृत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून लसीचे ऑनलाईन बुकिंग सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तयारी दर्शवली आहे.

- Advertisement -

प्रवासादरम्यानही मिळणार ही सुविधा

मेक माय ट्रिपचे सीईओ राजेश मागो यांनी सांगितले की, आज हजारो लोक मेक माय ट्रीप अॅपचा वापर करतायंत. त्यामुळे आम्ही लोकांच्या मदतीसाठी आमच्या मेक माय ट्रीप ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून बुकिंगची सुविधा उपलब्ध करुन देऊ इच्छितो. यासाठी आम्हाला API (Application Programing Interface) इंटीग्रेशनची आवश्यकता आहे. त्यांनी पुढे सांगितले की, वॅक्सिनेशन सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी इंटिग्रेशन उघडले जाईल ज्यामुळे प्रवासी बंदी उठल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळू शकतील. यासंदर्भात पेटीएम आणि इन्फोसिसकडून कोणतेही विधान आले नाही.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लसीकरणाची प्रक्रिया भारतात वेगाने सुरु आहे. आतापर्यंत देशात २४.२ कोटींपेक्षा जास्त लस डोस देण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांत फेसबुक आणि गूगल सारख्या बड्या प्लॅटफॉर्मने HealthifyMe सारखे स्टार्टअपवर काही नवीन टुल्स आणले आहेत. यामुळे लसीकरणासाठी लोकांना स्लॉट बुक करणे सोपे होईल. यातील Under45 आणि GetJab रातोरात लोकप्रिय झाले कारण यातून वॅक्सिन स्लॉट उघडताच बुकिंगपासून ते युजर्सला अलर्ट पाठवून कोव्हिन प्लॅटफॉर्मवर बुकिंग कंफर्म झाल्याची सुचना देण्यात आली.

- Advertisement -

Coronavirus : कोरोनाबाधितांना आता वॅक्सिनची गरज नाही, आरोग्य तज्ज्ञांचा दावा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -