घरव्हिडिओअक्षय कुमार ट्रोल तर नसिरुद्दीन, शरद केळकरचे मात्र कौतुक

अक्षय कुमार ट्रोल तर नसिरुद्दीन, शरद केळकरचे मात्र कौतुक

Related Story

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आले. नसिरूद्दीन शहा, महेश मांजरेकर, अमोल कोल्हे आणि अगदी अलिकडे चिन्मय मांडलेकर, शरद केळकर यांनी साकारलेली महाराजांची भूमिका बऱ्याच प्रमाणात लोकप्रिय देखील झाली. इतकंच काय तर, दिवंगत अभिनेते चंद्रकांत मांढरे यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका आजही असंख्य प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर आहे. सध्या शिवरायांवर आधारित अनेक चित्रपट येत आहेत, त्यामधील ऐतिहासिक संदर्भ किंवा भूमिकेमुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ सिनेमामध्ये अभिनेता अक्षय कुमार शिवरायांची भूमिका साकारत आहे आणि याला प्रेक्षकांनी तीव्र विरोध दर्शवला. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांचा घेतलेला हा आढावा

- Advertisement -