घरव्हिडिओदुर्घटनेनंतर अमरावतीतील प्रशासन सतर्क

दुर्घटनेनंतर अमरावतीतील प्रशासन सतर्क

Related Story

- Advertisement -

“नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर आता राज्यात ‘ब्लेम गेम’ केला जात आहे. मात्र, सध्या ती वेळ नाही. त्यामुळे अशी दुर्घटना कोणत्याही रुग्णालयात होऊ नये, म्हणून प्रशासन सतर्क झाले आहे”. याचपार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यामध्ये अचानक अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि डॉ. पंजाबराव देशमुख मेडीकल कॉलेजच्या रुग्णालयास भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली. तसेच या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांशी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी संवाद साधून तेथील ऑक्सिजन टॅंकची पाहणी केली आणि दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले”.

- Advertisement -