घरव्हिडिओकोरोनाच्या सावटाखाली बळीराजाने केले सर्जा राजाचे पूजन...

कोरोनाच्या सावटाखाली बळीराजाने केले सर्जा राजाचे पूजन…

Related Story

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील विविध गावांमध्ये धोरणाच्या सावटाखाली ही बळीराजाने आपल्या बैलजोडीची मनोभावे पूजा केली त्यांची आकर्षक सजावट करत नैवेद्य देऊन पूजा केली. पिंपळगाव खांब येथील शेतकरी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैल जोडीच्या पाठीवर लढण्याची प्रेरणा देणारा संदेश लिहून बळीराजाच्या कष्टाची जाणीव करून दिली. कोरोनामुळे मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवूनी नुसते लढ म्हणा…. मग बघा…ताकद माझ्या बळीराजाची. असा प्रेरणादायी संदेश देऊन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रामकुंड परिसरात, कृषीउत्पन्न बाजार समिती परिसरातही बैलांना सजवून मिरवणूक काढण्यात आली. त्याचप्रमाणे शहर परिसरातील पाथर्डी, पिंपळगाव खांब, दाढेगाव, वडनेर दुमाला, म्हसरूळ, गंगापूर, सातपूर, अंबड, कामटवाडे, आडगावमध्येही बैलांची पारंपरिक पद्धतीने बैलांची सजावट करून बैलांचे पूजन करण्यात आले.

- Advertisement -