घरमनोरंजन'माझ्यासाठी प्रार्थना करा'; म्हणत संजय दत्त पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल

‘माझ्यासाठी प्रार्थना करा’; म्हणत संजय दत्त पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल

Subscribe

अभिनेता संजय दत्त याला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला असून आज, मंगळवारी तो पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. संजय दत्त आज सायंकाळी कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता जात असताना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर छायाचित्रकारांनी गर्दी केली. त्यावेळी त्याने pray for me, (माझ्यासाठी प्रार्थना करा), असे म्हणत त्यांना हात दाखवला. संजय दत्तसोबत पत्नी मान्यता दत्त आणि दोन्ही बहिणी प्रिया तसेच नम्रता याही होत्या.

- Advertisement -

संजय दत्त गेल्या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्याला श्वसनाचा त्रास होत होता. दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. हा आजार तिसऱ्या स्टेजवर असल्याचेही सांगितले गेले. तसेच तो उपचारासाठी अमेरिकाला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. मात्र संजय दत्त मुंबईतच असून आज पुन्हा एकदा तो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला आहे.

हेही वाचा –

‘या’ झाडासाठी २४ तास असतो कडक पहारा; तर देखभालीसाठी केले जातात १५ लाख खर्च

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -