घरव्हिडिओ'संजय राऊत कधी नव्हे ते खरे बोलले'

‘संजय राऊत कधी नव्हे ते खरे बोलले’

Related Story

- Advertisement -

“संजय राऊत कधी नव्हे ते खरे बोलले. राणे साहेबांच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे आणि ती वाढत राहणार आहे. म्हणूनच तर शिवसेनेला ते झेपलं नाही, असो मी पण अपेक्षा करते की आपल्या बंधूलाही लवकरच मंत्री पद मिळेल. जेणे करून आपल्यालाही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आभार मानण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. आपण जे स्मृती इराणी बद्दल बरळलात. मुळात तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे? ते सांगा. मग मी तुम्हाला त्यांचा आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत नक्की खुलासा देईन. आपणास एक स्पष्ट सांगायचे आहे की, संजय राऊतजी भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवा. अन्यथा आम्हा महिलांनाही आमचा सन्मान राखण्यासाठी आरे ला कारे करण्याची भाषा वापरता येते”, असे खडेबोल भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सुनावले आहेत.

- Advertisement -