घरCORONA UPDATEकोरोनापासून वाचण्यासाठी 'फायझर'च्या 'बूस्टर डोस'ची गरज, कंपनी मागणार परवानगी

कोरोनापासून वाचण्यासाठी ‘फायझर’च्या ‘बूस्टर डोस’ची गरज, कंपनी मागणार परवानगी

Subscribe

संपूर्ण जगात कोरोना लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. कोरोनाच्या बदलत्या व्हेरियंट आणि त्यावर लसींचा होणार परिणामांवर तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. यातच कोरोनापासून वाचण्यासाठी फायझर-बायोएनटेक कंपनीच्या कॉमिरनेटी या लसीला अधिक प्रभावी सिद्ध करण्यासाठी बूस्टर डोसची (तिसऱ्या डोसची) आवश्यकता निर्माण झाली आहे. या लसीच्या बूस्टर डोसमुळे दक्षिण अफ्रिकेतील कोरोनाच्या बीटा व्हेरियंटपासून संरक्षण मिळण्याची अपेक्षा आहे. फायझरची लस भारतात आढळणाऱ्या डेल्टा व्हेरियंटविरोधातही प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे दोन डोसनंतर १२ महिन्यांच्या अंतराने फायझरचा बूस्टर डोस इम्युनिटी सिस्टम मजबूत करण्याबरोबरचं कोरोनाच्या नव्या म्युटेंटवरही प्रभावी ठरणार असल्याचा दावा फायझरने केला आहे.

‘बूस्टर डोस’ला मंजुरीची प्रतिक्षा

ऑगस्ट महिन्य़ात फायझर कंपनी बूस्टर डोसच्या आपतकालीन वापरासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे परवानगी मागण्यासाठी योजना आखत आहे. कारण फायझर लसीचा तिसरा बूस्टर डोस शरीरातील अँटीबॉडीचे प्रमाण कोरोना व्हेरियंटविरोधात दहा टक्क्यांहून वाढवत आहे. तर फायझरचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांचे कोरोनापासून संरक्षण होण्यास मदत होत आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटपासून वाचण्यासाठी फायझर लसाचा प्रभाव कमी पडत आहे. एका संशोधनानुसार, यापूर्वी कोरोना संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तीस पून्हा कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झाल्यास त्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी तयार करण्यास फाय़झर लस फारशी प्रभावी नसल्याचे सिद्ध झाले आहे. यावर फायझरचा डेटा असे सांगतो की, सहा महिन्यांनंतर कोरोना विषाणूंविरूद्ध लसीचा प्रभाव केवळ ८० टक्केचं राहतो. त्यामुळे फायझर लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना कोरोनापासून स्वत:चा बचाव करणे सोप्पे जात आहे.

डेल्टा व्हेरिएंटचा सर्वात जास्त धोका

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक धोकादायक असल्याचे म्हटले आहे. तर भारतातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान डेल्टा व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या अधिक वाढली. यात भारतात लसीकरण मोहिम सुरु झाली असली तर फक्त ५ टक्केचं नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अद्याप कमी झाला नाही.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -