घरव्हिडिओपाच महिन्यानंतर सामान्य खरुची (Common Kestrels) पक्ष्यांनी आकाशात घेतली भरारी

पाच महिन्यानंतर सामान्य खरुची (Common Kestrels) पक्ष्यांनी आकाशात घेतली भरारी

Related Story

- Advertisement -

गेल्या डिसेंबर महिन्यात ठाणे वनविभागाने एका व्यक्तीला पशु-पक्ष्यांची तस्करी करताना ताब्यात घेतले. यात ईगल आऊल, ब्लॅक शोल्डर काईट आणि स्टार कासव इत्यादी पशु-पक्ष्यांची सुटका करण्यात आली. यातील काही पशु-पक्ष्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. तर त्यातील ३ सामान्य खरुची (Common Kestrels) पक्ष्यांची पंख कापून टाकण्यात आली होती. त्यांना मात्र रॉ संस्थेकडे देखभालीसाठी आणि उपचारासाठी ठेवण्यात आले होते. पशुवैद्यकीय डॉ. रीना देव या पक्ष्यांवर उपचार करत होत्या. साधारण पाच महिन्यापासून यांच्यावर उपचार सुरू होते. पक्ष्यांना प्रवासामुळे तणाव आला होता. तसेच इतर पक्ष्यांच्या सहवासात ठेवल्यामुळे त्यांना संसर्ग झाला होता. परंतु, आता या पक्ष्यांची सुटका संस्थेच्या स्वयंसेवकांनी केली आहे.

- Advertisement -