घरCORONA UPDATEराज्यासह देशात विजेच्या मागणीत वाढ!

राज्यासह देशात विजेच्या मागणीत वाढ!

Subscribe

राज्यात विजेची कमाल मागणी ही १६० गिगावॉटपर्यंत पुन्हा एकदा पोहोचली आहे.

देशात पुन्हा एकदा विजेची मागणी वाढण्याची सुरूवात झाली आहे. लॉकडाऊननंतर ठिकठिकाणी नियम शिथील झाल्यानेच आता उद्योगांची वीज मागणी वाढायला सुरूवात झाली आहे. राज्यात विजेची कमाल मागणी ही १६० गिगावॉटपर्यंत पुन्हा एकदा पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात कमी झालेली विजेची मागणी ही पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या आधीच्या काळात जितकी होती तितक्या दिशेने वाढू लागली आहे.

देशात लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर पुन्हा एकदा सुरू झालेले व्यवसाय, उद्योग याचा परिणाम म्हणजे आता पुन्हा एकदा विजेच्या मागणी वाढली आहे. राज्याअंतर्गत सुरू झालेली ट्रेनची वाहतूक, फॅक्टरीमध्ये सुरू झालेली कामे यामुळे ही विजेची मागणी वाढायला सुरूवात झाली आहे. देशात गेल्या वर्षी या काळात जितकी विजेची मागणी होती तितकीच विजेची मागणी गाठण्याची सुरूवात पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात कमाल विजेची मागणी ही ४०७० दशलक्ष युनिट इतकी होती. तर यंदा ही विजेची मागणी ३६६९ दशलक्ष युनिट इतकी पोहचली आहे. महाराष्ट्रासह देशात विजेची मागणी वाढण्यासाठी प्रामुख्याने दोन कारणे आहेत. पहिल कारण म्हणजे लॉकडाऊनच्या काळात आर्थिक उलाढालीसाठी दिलेल्या सवलतींमुळे सुरू झालेले उद्योग, कारखाने, व्यवसाय. तर दुसरे कारण म्हणजे यंदाच्या वर्षातला उकाडा. देशात उष्णतेच्या लाटेच्या वातावरणामुळेही विजेची मागणी वाढलेली आहे.

- Advertisement -

मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात देशात विजेची मागणी २७०० ते २९०० दशलक्ष युनिट इतकी होती. तर दुसऱ्या दहा दिवसात ३६०० दशलक्ष युनिट इतकी विजेची मागणी पोहचली. गेल्या आठवड्यात अम्फन वादळामुळे विजेच्या मागणीत थोडी कपात झाली. राज्याअंतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने ही विजेची मागणी ५०० दशलक्ष युनिट इतकी वाढली. देशातल्या विजेच्या मागणी उद्योगांची विजेची मागणी ४१.१६ टक्के आहे, तर कृषीपंपाची विजेची मागणी १७.६९ टक्के आहे. तर वाणिज्यिक क्षेत्राची विजेची मागणी ८.२४ टक्के इतकी आहे. गेल्या वर्षी विजेची कमाल मागणी ही १८३ गिगावॉट इतकी पोहचली होती. सध्या देशात वीज निर्मितीची क्षमता ३६८.६९ गिगावॉट इतकी आहे.

देशातली विजेची मागणी वाढतानाच राज्यातली विजेची मागणी वाढण्यासाठी सुरूवात झाली आहे. मुंबई वगळता राज्यातील विजेची मागणी ही सकाळी १८ हजार १०७ मेगावॉट तर दुपारी १८ हजार ७६२ मेगावॉट इतकी पोहचली आहे. लॉकडाऊनच्या काळात हीच विजेची मागणी १३ हजार मेगावॉट इतकी होती. मुंबईतील विजेच्या मागणीतही आता वाढ होऊ लागली असून मुंबईतील विजेची मागणी आता २२६४ मेगावॉट इतकी पोहचली आहे. राज्यात सुरू झालेल्या उद्योग आणि व्यवसायामुळे तसेच उकाड्यामुळे ही विजेची मागणी वाढायला सुरूवात झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -