घरव्हिडिओCorona : मुंबईकरांवर आता पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची नजर

Corona : मुंबईकरांवर आता पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची नजर

Related Story

- Advertisement -

मुंबई पोलीस दाट गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नजर ठेवणार आहे. सोशल डिस्टसिंगचे पालन होते की नाही? हे देखील ड्रोनद्वारे पाहणार आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत आज वरळी मुंबई पोलीस सह आयुक्त विनय चौबे यांनी पोलिसांना याचं प्रात्यक्षिक दिलं. “या नवीन, मोठ्या ड्रोनच्या सहाय्याने पोलिस वेगाने, पोहोचायला दुर्गम, दाट वस्तींमधे लक्ष ठेऊ शकतील. या ड्रोनमध्ये बसवलेल्या जाहीर उद्घोषणा प्रणालीने पोलिस लोकांना सूचना/निर्देश सुध्दा देऊ शकतील. अतीसंवेदनशील संसर्गजन्य ठिकाणी अशा ड्रोन्सची पोलिसांना मदत होईल.”, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

- Advertisement -