घरताज्या घडामोडीसंतापजनक! रुग्ण तडफडत असताना नर्स टिकटॉक व्हिडीओ पाहण्यात बिझी!

संतापजनक! रुग्ण तडफडत असताना नर्स टिकटॉक व्हिडीओ पाहण्यात बिझी!

Subscribe

सध्या देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. याच दरम्यान बिहारमधील लखीसराईतील भयानक वास्तव समोर आले आहे. लखीसराईतील सदर रुग्णालयात डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी मनमानी करत असल्याच्या बातम्या अनेकवेळा समोर आल्या आहेत. परंतु कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि नर्सेसचा निष्काळजीपणा कायम आहे. एखाद्या गरीब व्यक्तीचा जीव गेला तरी त्यांना काही फरक पडत नाही.

जनज्वारच्या वृत्तानुसार, अशीच एक धक्कादायक घटना लखीसराईतील सदर रुग्णालयात घडली आहे. या रुग्णालयात उपचारा अभावी एका रुग्णाचा मृत्यू झाला. पण याचदरम्यान नर्स टिकटॉक व्हिडीओ पाहण्यात व्यस्त होती. जेव्हा रुग्ण जोरजोरात श्वास घेत होता तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना शोधले. तसंच त्यावेळेस डॉक्टर्स-नर्सेस देखील गायब झाले होते. मात्र एक नर्स टिकटॉक व्हिडिओ पाहण्यात व्यस्त असल्याचे दिसले. तर इतर डॉक्टर्स आणि नर्सेस कुठे आहे हे माहिती नव्हते.

- Advertisement -

एका खासगी शाळेत शिक्षक असलेल्या ३७ वर्षीय शिवबालक पासवानला प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्याला ९ एप्रिल रोजी लखीसराई येथील सदर रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर तिथे डॉक्टर्स आणि नर्सेस कोणीच नव्हते. त्यावेळेस शिवबालक याची प्रकृती फारच गंभीर होती. त्याला ऑक्सिजनची फार आवश्यकता होती. अशावेळेस रुग्णाची गंभीर परिस्थिती असूनही कोणतीही नर्स किंवा डॉक्टर तपासण्यासाठी आले नाही. तासभरात कोणतेही उपचार न केल्यामुळे शिवबालक पासवान याचा मृत्यू झाला. घरातील कर्ताधर्ता एकमेव पुरुष होता. शिवबालकला एक वृद्ध आई, पत्नी आणि तीन लहान मुले आहेत.

या प्रकरणाबाबत भारतीय युवा काँग्रेसचे माजी सरचिटणीस निशांत पासवान म्हणाले की, आम्ही शिवबालकला गंभीर परिस्थितीत सदर रुग्णालयात घेऊन आलो होतो. परंतु आम्ही त्याच्या जीव वाचवू शकलो नाही. या देशातील व्यवस्था किती गरीब लोकांचा जीव घेईल माहित नाही. जेव्हा मी रुग्णालयात पोहोचलो. तेव्हा तिथे कोणी नर्स किंवा डॉक्टर ही नव्हते. कुटुंबियातील लोक एक तास या प्रशासकांची वाट पाहत होते. जेव्हा मी रुग्णालयातील कॅम्पसमध्ये डॉक्टर आणि नर्सला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस एक नर्स अँड्रॉईड फोनमध्ये एकांतात टिकटॉक व्हिडिओ पाहत होती.

- Advertisement -

निशांत पासवान पुढे म्हणाले की, आदरणीय मुख्यमंत्री नितीश कुमार, सुशासन बाबू म्हणून तुम्ही किती दिवस बिहारच्या लोकांना फसवत राहणार? आपल्या घरातील एकमेव कमवणार माणूस शिवबालक हा एक शिक्षक होती. त्याच्या मागे त्याची एक वृद्ध आई, पत्नी आणि तीन लहान लहान मुले आहेत.

शिवबालक यांच्या निधनानंतर रुग्णालयाने मृत्यू प्रमाणपत्र कुटुंबियाच्या स्वाधीन केलं असून पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मिळताच शवविच्छेदन करण्यात आले आहे. अजूनपर्यंत याबाबत कोणताही अहवला आलेला नाही. तसंच अजूनही पोलिसांना रुग्णालय व्यवस्थापनावर कोणतीही कारवाई केली नाही. तसंच कोणताही गुन्हा देखील केला नाही.


हेही वाचा – Lockdown : चौकशी करतेवेळी ‘तो’ पोलिसांवर थुंकला; गुन्हा दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -