घरव्हिडिओसोमय्यांचा देशमुखांवरुन ठाकरे सरकारला पुन्हा इशारा

सोमय्यांचा देशमुखांवरुन ठाकरे सरकारला पुन्हा इशारा

Related Story

- Advertisement -

देशमुखांना लपवण्याचे धंदे बंद करा, सरेंडर करा, ट्रान्सफरचा किस्सा बाकी आहे. तो सीएमपर्यंत पोहोचणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकार, अलिबाबा चाळीस चोरचे सरकारमधील अर्धे गायब आणि अर्धे रुग्णालयात असणार आहेत. कोरोना काळात १०० कोटी रुपये जमवण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आला आहे. ईडीच्या कारवाईनंतर अनिल देशमुख गायब झाले आहेत. यामुळे अनिल देशमुखांनी सरेंडर व्हायला पाहिजे, असे भाजप माजी अध्यक्ष किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुखांना लपवण्याचे धंदे बंद केले पाहिजेत. देशमुखांना लपवण्याचे धंदे बंद करा आणि त्यांना ईडीला सरेंडर करा, असे सोमय्या यांनी म्हटलं आहे. ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आरोप आहेत. एक बदल्यांचा किस्सा आहे त्याचे कनेक्शन थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकारमधील अलिबाबा चाळीस चोर अर्धे गायब होतील आणि अर्धे रुग्णालयात असतील, असा इशारा सोमय्यांनी दिला आहे.

- Advertisement -