Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ सरकाला मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडतो

सरकाला मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडतो

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १६ जूनला कोल्हापुरातून आंदोलनाची हाक खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी दिली आहे. या मोर्चाच्या नियोजनसाठी मराठा समाजातील प्रतिनिधींची बैठक झाली असून या बैठकीत महाराष्ट्रात होणारा हा पहिलाच मोर्चा यशस्वी करून मराठ्याची ताकद दाखवण्याचा निर्धार आहे. तसेच आंदोलनाची हाक देणाऱ्या संभाजी राजे यांच्यामागे पक्षीय भेद बाजूला ठेवून या दिवशी कोल्हापूर जिल्हा बंद ठेवण्याबाबतही चर्चा झाली असून मोर्चाची सुरुवात, मार्ग आणि स्वरूप याबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. हा मोर्चा सरकारला धडकी, भरेल असा काढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सरकारने नेमलेला मागास आयोगात एकही मराठा नसल्याचा आरोप ही यावेळी करण्यात आला आहे.

- Advertisement -