घरव्हिडिओइगतपुरीमध्ये बिबट्याचा वावर

इगतपुरीमध्ये बिबट्याचा वावर

Related Story

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यात काही दिवसांपासून डोंगरांना आग लावण्यात येत असल्यामुळे गावामध्ये बिबट्या व जंगली प्राण्यांचा वावर जास्त प्रमाणात वाढला आहे. यामुळे वनविभागाची डोकेदुखी वाढली आहे. या तालुक्यातील अडसरे गावात रोज रात्री बिबट्याचा वावर होत आहे. या कारणास्तव वन विभागाने काळजी बाळगता ट्रॅप कॅमेरे , पिंजरे लावून ठेवले होते. त्यात 6 एप्रिल रोजी पहाटे एका बिबट्याला जेलबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मात्र अजूनही तेथे काही बिबट्याचा वावक असल्याचा संशयाने ट्रॅप कॅमेरे व पिंजरे लावून ठेवण्यात येणार आहे. यातून वनविभागाची उत्कृष्ट कामगिरी समोर आली आहे. यावेळी इगतपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे , वन परिमंडळ अधिकारी इ. टी. भले , वनरक्षक संतोष बोडके,वनरक्षक एफ.जे. सय्यद ,वनरक्षक श्रीमती रेशमा पाठक , वनरक्षक एम.जे. पाडवी ,वनरक्षक श्रीमती बी.एस खाडे ,वनमजुर दशरथ निर्गुडे, भोरू धोंगडे , गोविंद बेडकुली , ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisement -