घरव्हिडिओ...आणि शिवसेनेला सुबुद्धी सुचली

…आणि शिवसेनेला सुबुद्धी सुचली

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जी गुप्त बैठक झाली. त्यानंतर कदाचित पंतप्रधानांनी त्यांना दिलेल्या कानमंत्रामुळेच बुलेट ट्रेनचा प्रस्ताव पुन्हा एकदा महासभेत घेण्याची सुबुद्धी शिवसेनेला सुचली असावी, असे ठाण्याच्या भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी म्हटले आहे. याआधी ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव चार वेळा नामंजूर करण्यात आला होता. मागील वेळेस जावे हा प्रस्ताव आला त्यावेळी हा प्रस्ताव दफ्तरी बंद केल्याचे महापौर यांनी सांगितले होते. मात्र, दफ्तरी बंद प्रस्ताव महासभेत आणण्याची नामुष्की शिवसेनेवर का ओडवली हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यामुळेच भाजप कडून शिवसेनेवर आरोप केले जात आहेत.

- Advertisement -