घरक्रीडाIPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या आयपीएलमधील सहभागाबाबत पॉन्टिंगचे मोठे विधान, म्हणाला...

IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या आयपीएलमधील सहभागाबाबत पॉन्टिंगचे मोठे विधान, म्हणाला…

Subscribe

आयपीएलचा उर्वरित मोसम १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, इंडियन प्रीमियर लीग (IPL) या जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चितच काळासाठी स्थगित करावा लागला होता. कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाल्याने भारतात होत असलेली ही स्पर्धा मे महिन्यात स्थगित करण्यात आली. परंतु, बीसीसीआयने आयपीएलचा उर्वरित मोसम १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल संपल्यावर दोन दिवसांत टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. त्यामुळे बरेचसे प्रमुख परदेशी खेळाडू या उर्वरित मोसमाला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, टी-२० वर्ल्डकपच्या तयारीसाठी आयपीएल सर्वोत्तम स्पर्धा असून ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी उर्वरित मोसमात खेळले पाहिजे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले.

तयारीला सुरुवात केली पाहिजे

मागील तीन-चार महिन्यांत एकही सामना न खेळलेल्या खेळाडूंनी आता टी-२० वर्ल्डकपच्या तयारीला सुरुवात केली पाहिजे. त्यांनी जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध पुन्हा खेळले पाहिजे. आयपीएल आणि टी-२० वर्ल्डकप या दोन्ही स्पर्धा युएईत होणार आहेत. त्यामुळे त्याच परिस्थितीत, जगातील सर्वोत्तम टी-२० लीगमध्ये खेळणे ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी फायदेशीर ठरले, असे पॉन्टिंग म्हणाला.

- Advertisement -

कमिन्स उर्वरित मोसमाला मुकणार?

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स मात्र आयपीएलच्या उर्वरित मोसमाला मुकणार हे जवळपास निश्चित आहे. आयपीएल मोसमाच्या उत्तरार्धाला मी खेळण्याची शक्यता कमी आहे. आयपीएलनंतर लगेच टी-२० वर्ल्डकप होणार आहे. त्या स्पर्धेत खेळण्यासाठी मी सज्ज असेन, असे कमिन्सने सांगितले. आयपीएलच्या उर्वरित मोसमाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये रंगणार आहे.


हेही वाचा – पुजारा, रहाणेच्या कामगिरीत लवकरच सुधारणा होईल

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -