घरव्हिडिओनाशिकमधला प्रकार, पोलीस म्हणतात...

नाशिकमधला प्रकार, पोलीस म्हणतात…

Related Story

- Advertisement -

हेल्मेट न घातल्याने काय होते याचा अनुभव आपण आजवर घेतला असेल वा कुणाचा अनुभव ऐकला, वाचला असेल. पण हेल्मेट न घाल्याने मुंडकं उडालं आणि दुचाकीचालक थेट रस्त्यावर विनाडोक्याचाचा आला असं आपण कधी बघितलंय? नाशिकच्या रस्त्यावर नेमकं असच घडलं.. अर्थात नाशिक शहर वाहतूक शाखेच्या वतीने केलेलं हे अनोखं प्रबोधन होतं. शहर परिसरात नागरिकांना हेल्मेट परिधान करण्यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. वाहतूक शाखा पोलिसांच्या वतीने हेल्मेट जनजागृती करण्यासाठी डोके नसलेला चालक दुचाकीवर बसून आपला जीव मुठीत धरून वाहन चालवत असल्याचे प्रबोधन करण्यात येत होते. वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यानी व्दारका, शालिमार, रविवार कारंजा, एमजी रोड , शालिमार परिसरात नागरिकांचे प्रबोधन केले.

- Advertisement -