घरव्हिडिओशिवसेनेच्या कोत्या प्रवृत्तीचा निषेध - प्रसाद लाड

शिवसेनेच्या कोत्या प्रवृत्तीचा निषेध – प्रसाद लाड

Related Story

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे केवळ शिवसेनेचे दैवत नसून ते संपूर्ण महाराष्ट्राचे तसेच हिंदुस्तानचे हिंदुह्रदयसम्राट आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे दर्शन घेण्याचा अधिकार देशातील प्रत्येक धर्माच्या प्रत्येक नागरिकाला आहे. बाळासाहेबांनी समाजात दरी निर्माण न करता समाजातील लोकांना एकत्र घेऊन एका विशिष्ट धर्माला घेऊन विशिष्ट काम करण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शाखा प्रमुखापासून केंद्रीय मंत्री पदापर्यंत गेलेल्या नारायण राणेंनी दर्शन घेतल्यामुळे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी शुद्धीकरण करण्यात आले असेल, तर शिवसेनेच्या या कोत्या प्रवृत्तीचा निषेध आहे, असे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

- Advertisement -