घरताज्या घडामोडीशाळा सुरू करण्याचा निर्णय ४ दिवसांत होणार? आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत

शाळा सुरू करण्याचा निर्णय ४ दिवसांत होणार? आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत

Subscribe

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शाळा सुरु करण्याबाबतच्या निर्णयावर विचार सुरु असल्याचे सांगितले आहे.

शालेय शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अवघ्या २४ तासांत या निर्णयाला ब्रेक लागला होता. अखेर येत्या ४ दिवसांत शाळा सुरु होण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील शाळा आणि कॉलेज सुरु करण्याचा निर्णय येत्या ४ ते ५ दिवसांत होणार आहे. टास्क फोर्सच्या अहवाहालानुसार शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सचा अहवाल प्राप्त झाल्यावर शाळा सुरु करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शाळा सुरु करण्याबाबतच्या निर्णयावर विचार सुरु असल्याचे सांगितले आहे. शालेय शिक्षण विभागने शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर टास्क फोर्सनं काळजी घेण्याचे आवाहन केलं होते. टास्क फोर्स अहवाल सादर करणार असून या अहवालावर विचार करुन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सावंत यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर टास्क फोर्सने भीती व्यक्त केली आहे. अद्यापही कोरोना लसीकरण विद्यार्थ्यांचे झालं नाही. दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं अद्याप लसीकरण झालं नाही. रिस्क घेऊ नये असे टास्क फोर्सच्या सदस्यांना वाटत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्स सोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेमार आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

शाळा सुरु करण्याबाबत केली होती घोषणा

राज्यात ज्या ठिकाणी शहरी भागात रुग्ण संख्या कमी आहे. निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या भागात पहिल्यांदा मोठ्या मुलांना बोलवण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. तसेच शिक्षकांचे पुर्ण लसीकरण करण्यावर भर द्यावा, मुलांना शाळेत बोलवल्यावर कोरोना नियमांचे पालन करण्यात यावे यावर देखील भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागात कमिटी केली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत राहिल. तसेच शहरी भागात आयुक्तांच्या अंतर्गत कमिटी तयार करण्यात आली असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

- Advertisement -

शाळा सुरु करण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. यामध्ये इयत्ता ५ वी ते ७ वी ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. यापुर्वी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.


हेही वाचा :  खाजगी रेल्वेची ३० हजार कोटींची बोली प्रक्रिया भारतीय रेल्वेकडून रद्द


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -