Wednesday, August 10, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ प्रताप सरनाईकांच्या सोमय्यांविरोधातील भूमिकेत बदल

प्रताप सरनाईकांच्या सोमय्यांविरोधातील भूमिकेत बदल

Related Story

- Advertisement -

ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी तक्रार केली होती. प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीद्वारे चौकशी सुरु आहे. यामुळे सोमय्या आणि प्रताप सरनाईकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सरनाईक आणि किरीट सोमय्या आहेत. फडणवीस आणि शिंदेंचं सरकार आहे. शिंदेंच्या गटात अनेक आमदार आहेत ज्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे कारवाई सुरु आहे. याबाबत सरनाईकांना प्रश्न विचारला असता त्यांनी सोमय्या म्हणजे देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत का? असा सवाल सरनाईकांनी केला आहे. दरम्यान सरनाईकांची भूमिका बदलली असल्याचे यावरुन दिसत आहे.

- Advertisement -