मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दिल्ली दौऱ्यावर; पंतप्रधान मोदी, अमित शहांची घेणार भेट

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार

maharashtra Chief Minister Eknath shinde today Delhi visit meet pm modi and amit shah

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शुक्रवारी दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. या दौऱ्यात शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील. या भेटीत राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांसह मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होऊन मंत्र्यांच्या यादीला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांचा हा पहिलाच दौरा आहे.

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत शिवसेनेत अभूतपूर्व बंड घडवून आणले. मोदी आणि शाह या भाजपच्या सर्वोच्च नेत्यांच्या पाठिंब्यामुळे शिंदे यांचे बंड यशस्वी झाले. गुवाहाटीत असताना शिंदे यांनी भाजपचा महाशक्ती असा उल्लेख केला होता. शिंदे यांचे बंड केवळ यशस्वीच झाले नाही तर त्यांना भाजपच्या पाठींब्याने थेट मुख्यमंत्रिपद मिळाले. त्यामुळे शिंदे हे दिल्ली दौऱ्यात भाजप नेत्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानणार आहेत. यावेळी मंत्रिमंडळाचे खातेवाटप आणि संभाव्य मंत्र्यांच्या नावाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेश भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, दिल्लीत शुक्रवारी मुक्काम करून एकनाथ शिंदे हे शनिवारी विशेष विमानाने पुण्यात येतील. तेथूनच ते पंढरपूरला रवाना होतील. आषाढी एकादशीनिमित्त पहाटे विठ्ठलाची महापूजा करून शिंदे हे रविवारी मुंबईत येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय सत्तांतरणानंतर अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृतपणे मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. शिंदे घराण्यातला पहिला माणूस आज मुख्यमंत्री विराजमान होत असल्याने एकूणच आनंदाचे वातावरण होते. यावेळी त्यांच्यासोबत संपूर्ण शिंदे कुटुंबीय उपस्थित होते.

शिंदे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या भव्यदिव्य कार्यालयात पूजा करण्यात आली. यावेळी संपूर्ण कार्यालय आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नव्या चेंबरमध्ये शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा फोटो लावण्यात आले असून त्याशेजारी शिंदे यांचे गुरू आनंद दिघे यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही फोटो लावला आहे.


गोदावरी खोऱ्यातील वाया जाणारे पाणी सिंचनासाठी वळवण्याबाबत प्रयत्न करा, मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना