घरव्हिडिओनाशिकच्या कोरोनाबाधितांवर आता रेल्वेमध्ये उपचार होणार

नाशिकच्या कोरोनाबाधितांवर आता रेल्वेमध्ये उपचार होणार

Related Story

- Advertisement -

नाशिकमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत रोजच शेकड्याने भर पडत आहे,अशा रुग्णांना उपचार करण्यासाठी बेड शिल्लक नसल्याच्या तक्रारी रोजच प्राप्त होत आहे मात्र मध्य रेल्वेने यावर उपाय योजना म्हणुन चाळीसगाव व नाशिकरोड रेल्वे स्थानकांवर आयसोलेशन रेल्वे गाडया धुळ खात पडलेल्या असून प्रशासनाने लक्ष दिले तर हजारो रुग्णांना उपचारासाठी सुविधा मिळण्यास मदत होईल, दरम्यान सेवा रेल्वेत रुग्णांना तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.

कोरोना संशयितांना ठेवण्यासाठी जागेची टंचाई लक्षात घेऊन विशेष सुविधा असलेली आयसोलेशन ट्रेन नाशिकरोड स्थानकावर उपलब्ध करुन दिली आहे. या विशेष गाडीचे उद्घाटन खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले होते फलाट क्रमांक चार जास्त मोठा असल्याने व इतर वर्दळीपासून दूर असल्याने येथे ठेवण्यात आली आहे. त्याच प्रमाणे भुसावळ विभागात अनेक स्थानकांवर रेल्वे व कोच अशाच विनावापर पडुन असल्याने सुविधा उपलब्ध असूनही रुग्णांची गैरसोय होत आहे.

- Advertisement -

भुसावळ विभागातील भुसावळ येथील रेल्वेचे रुग्णालय करोना बाधितांच्या सेवेत कार्यरत सुरु आहे, करोना बाधितांची गैरसोय होऊ नये यासाठी भुसावळ, बडनेरा,खंडवा, मनमाड येथे रेल्वेने आयसोलेट कोच तयार आहेत. एका कोच मध्ये किमान ५४ रुग्णांना दाखल करण्याची क्षमता आहे, त्यामुळे नाशिकरोडला २२ कोच, चाळीसगाव येथे २० कोचची आयसोलेशन ट्रेन एक महिन्यापुर्वीच उपलब्ध करुन दिली आहे.

- Advertisement -