- Advertisement -
मनसेने आपला जुना झेंडा बदलला असून त्याच्या जागी भगव्या रंगातील झेंडा आणला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. मनसेचं महाअधिवेशन आज पार पडत असून राज ठाकरे यांनी यावेळी या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेच्या नव्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे.
- Advertisement -