घरव्हिडिओब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली असून रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. परंतु, रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यासह देशात तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरुन राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये शनिवारी दिवसभर आरोपांच्या फैरी झडल्या होत्या. त्यांनतर दमणमधील रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. निर्यात बंदी असल्यामुळे या कंपनीकडे २० लाख रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा पडून असल्याचे आढळले आहे. या संचालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर डीसीपी कार्यालयात दाखल झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रेमडेसिवीवरुन हाय व्होलटेज ड्रामा सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -